बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात आपल्या बोल्ड आणि मादक अदा तसंच दिलखेचक डान्सने प्रेक्षकांची मनं जिंकणारी स्पर्धक म्हणजे हिना पांचाळ.

बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात आपल्या बोल्ड आणि मादक अदा तसंच दिलखेचक डान्सने प्रेक्षकांची मनं जिंकणारी स्पर्धक म्हणजे हिना पांचाळ.

वाइल्ड कार्ड म्हणून बिग बॉसच्या घरात एंट्री मारलेली हिना थोडक्यात अंतिम फेरीपर्यंत पोहोचू शकली नाही.

मलायका अरोराशी साधर्म्य असणारी हिना बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात भलताच भाव खाऊन गेली आहे.

बिग बॉस मराठी या रिएलिटी शोनंतर आता हिना आणखीन एका रिएलिटी शोमध्ये झळकली होती.

या शोचं नाव होते मुझसे शादी करोगी.

हिना पांचाळ ही दाक्षिणात्य बोल्ड अभिनेत्री आहे.

पण विशेष बाब म्हणजे, हिनाचा चेहरा बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराशी मिळताजुळता आहे.

त्यामुळे मलायकाची ‘Look-Alike’ म्हणून हिना ओळखली जाते.

हिनाने २०१४ साली तिचे फिल्मी करिअर सुरू केले होते.

पण अभिनेत्रीऐवजी आयटम गर्ल म्हणून तिला अधिक प्रसिद्धी मिळाली.

हिनाने अनेक दाक्षिणात्य चित्रपटात आयटम साँग केली आहेत.