मराठमोळी अभिनेत्री नेहा गद्रे बऱ्याच कालावधीपासून मराठी चित्रपटसृष्टीतून गायब आहे.

मराठमोळी अभिनेत्री नेहा गद्रे बऱ्याच कालावधीपासून मराठी चित्रपटसृष्टीतून गायब आहे.

नेहा सोशल मीडियावर सक्रीय असून या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत असते. केसांचा मेकओव्हर केल्यामुळे नेहाला ओळखणे कठीण झाले आहे.

2019 मध्ये नेहा ईशान बापटसोबत लग्नबेडीत अडकली. त्यानंतर ती ऑस्ट्रेलियामध्ये नवऱ्यासोबत स्थायिक झाली आहे.

ईशान बापट क्राइमस्टॉपर्स क्वीनलँड येथे कार्यरत आहे.

नेहा गद्रे पेशाने डॉक्टर असून एमबीबीएस ची पदवी प्राप्त केली. पण नेहाला अभिनयात रुची वाटू लागली.

सह्याद्री वाहिनीवरील अंतक्षरी आणि झी सारेगम शोमध्ये ती झळकली होती. गौरव महाराष्ट्राचा या शोमध्ये तिने परिक्षकाची भूमिका निभावली.

परंतु “मन उधाण वाऱ्याचे” या मालिकेमुळेच नेहाला प्रसिद्धी मिळाली होती. यानंतर तिने “अजूनही चांद रात आहे ” या मालिकेत रेवाची भूमिका साकारली.

“मोकळा श्वास” चित्रपटात मृण्मयी देशपांडेच्या बहिणीच्या भूमिकेत ती दिसली. बऱ्याच कालावधीनंतर नेहाने अभिनित केलेला “गडबड झाली” चित्रपट साकारलेला पाहायला मिळाली.