शिव दिनविशेषशिवाजी महाराजांचा काळातील विशेष तारखा व त्याची माहिती

१ मे १६६५: पुरंदरचा सफेद बुरूज स्फोटात उडाला. माची पुरंदर मोगलांच्या ताब्यात. पुरंदरचा बालेकिल्ला दिलेरखानाशी व मिर्झाराजांशी झुंजू लागला. वज्रगड व माची पुरंदर मोगलांच्या ताब्यात असल्यामुळे दोन्हीकडूनही पुरंदरच्या बालेकिल्ल्यावर एल्गार सुरू झाले.

१ मे १८१८: रोजी प्रचंड तोफांचा मारा करून मेजर एल्ड्रिजने चावंड किल्ला जिंकला आणि तो नाणेघाटाच्या म्हणजेच जीवधनच्या दिशेने निघाला होता.

३ मे १८१८: दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीतल्या बहुतेक सर्व किल्ल्यांची तोड़फोड़ केली. त्यात ३ मे १८१८ रोजी मेजर एल्ड्रिजने जीवधन किल्ला जिंकला.

४ मे १६४९: मोगलांविरोधात शस्त्र उचलणारा शूर हिंदू राजपूत छत्रसाल बुंदेला याचा जन्म. औरंगजेबासारख्या कट्टर इस्लामी बादशहालाही शह या छत्रसालाने दिला. छत्रपती शिवाजी राजे आणि छत्रसालाची भेटही इतिहासात झाली होती.

४ मे १७३९: वसई किल्ला मराठ्यान्नी प्रचंड रणसंग्राम करून जिंकला होता. मराठ्यांतर्फे किल्ल्याचा पूर्ण ताबा ‘सरसुभेदार शंकराजी केशव’ यांनी पेशव्यांच्या आज्ञेवरुन घेतला.

४ मे १७५८: बाजीराव आणि चिमाजीने खरच मराठी सत्तेचा दबदबा दख्खन पासुन रुमशेपावतो पसरवला. मरहट्यांची विजयी घोडी नर्मदा ओलांडुन गेली. थोरले बाजीराव हे एकमेव अपराजित सेनापती होते. अटकेच्या मोहिमेत तुकोजी होळकर आणि त्यांच्या सोबत असणारे सरदार राणोजी शिंदे यांनी अप्रतिम पराक्रम केला होता, रघुनाथरावाने वयाच्या २३व्या वर्षी अटकेवर भगवा फडकवला. राघोबाचा राघो-भरारी झाला. याच काळातिल ४ मे रोजी राघोबादादांचे नानासाहेबांना लिहीलेले एक पत्र मराठ्यांमधील चेतलेल्या आत्मविश्वासाचे बोलके उदाहरण आहे –“आपण लाहोर, मुल्तान, काश्मीर आणि अटकेच्या आसपासचे सुभे आपल्या अंमलाखाली आणले आहेत, आणि जे न आलेले प्रदेश आहेत ते लवकरच आपल्या राज्यात समाविष्ट करु. अहमदशहा अब्दालीचा पुत्र तैमु्र सुल्तान आणि जहानखान यांना आपल्या सैन्याने पराजित केले आहे. त्यांना आपण अक्षरश: नागवले आहे. आपले विस्कळीत सैन्य घेउन ते एव्हाना पेशावरपर्यंत पोहोचले असतिल. आम्ही आपले राज्य कंदहारपर्यंत वाढवण्याचे निश्चित केले आहे.” 
मराठी साम्राज्य उत्तरेत सिंधु नदी आणि कश्मीरपर्यंत, पुर्वेला ओरिसापर्यंत, दक्षीण-पश्विमेला गोव्यापर्यंत आणि दक्षीणेला म्हैसुरपर्यंत पसरले होते.बाजीराव आणि चिमाजीने खरच मराठी सत्तेचा दबदबा दख्खन पासुन रुमशेपावतो पसरवला. मरहट्यांची विजयी घोडी नर्मदा ओलांडुन गेली. थोरले बाजीराव हे एक अपराजित सेनापती होते. अटकेच्या मोहिमेत तुकोजी होळकर आणि त्यांच्या सोबत असणारे सरदार राणोजी शिंदे यांनी अप्रतिम पराक्रम केला होता, अटक मोहिमेचे नेतृत्व राघोबा पेशव्याकडे असल्याने त्याने याच काळातिल ४ मे रोजी राघोबादादांचे नानासाहेबांना लिहीलेले एक पत्र मराठ्यांमधील चेतलेल्या आत्मविश्वासाचे बोलके उदाहरण आहे –“आपण लाहोर, मुल्तान, काश्मीर आणि अटकेच्या आसपासचे सुभे आपल्या अंमलाखाली आणले आहेत, आणि जे न आलेले प्रदेश आहेत ते लवकरच आपल्या राज्यात समाविष्ट करु. अहमदशहा अब्दालीचा पुत्र तैमु्र सुल्तान आणि जहानखान यांना आपल्या सैन्याने पराजित केले आहे. त्यांना आपण अक्षरश: नागवले आहे. आपले विस्कळीत सैन्य घेउन ते एव्हाना पेशावरपर्यंत पोहोचले असतिल. आम्ही आपले राज्य कंदहारपर्यंत वाढवण्याचे निश्चित केले आहे.”बाजीरावापासुन राघोबांपर्यंतच्या या सगळ्या विजयांमुळे मराठी साम्राज्य उत्तरेत सिंधु नदी आणि कश्मीरपर्यंत, पुर्वेला ओरिसापर्यंत, दक्षीण-पश्विमेला गोव्यापर्यंत आणि दक्षीणेला म्हैसुरपर्यंत पसरले. याच मोहिमेमुळे राघोभारारी अशी ओळख राघोबा पेशव्याला मिळाली..

५ मे १६५८: विजापूरकरांची महत्वाची ठाणी असलेले चौल, तळेगड, घोसाळगड शिवाजी राजांनी जिंकली.

५ मे १६६३: गोव्याच्या पोर्तुगीज वॉइसरॉयने त्याच्या दख्खनच्या गवर्नरला शिवरायांच्या सागरी हालचालींबद्दल सावधान करणारे पत्र लिहिले.१६५७ पासून राजांनी कल्याण-दुर्गादी येथून आरमार उभे करण्यास सुरवात केली होती. १६६३ पर्यंत बऱ्याच बोटी बनवून उत्तर कोकणामधले काही सागरी किल्ले मराठ्यान्नी काबीज केले होते. तसेच दाभोळ, राजापूर सारखी संपन्न बंदरेसुद्धा ताब्यात घेतली होती.

६ मे १६५६: रायरी हा किल्ला शिवरायांनी जिंकला आणि त्याचे रायगड असे नामकरण केले.रायरीहा किल्ला जावळीच्या मोरे याच्याकड़े होता. राजांनी जानेवारी १६५६ मध्ये जावळी जिंकल्यावर हा मोरे तिकडून पळाला तो थेट रायरीवर येउन बसला. राजांनी याची पाठ काढली आणि रायरीला वेढा घातला. अखेर काही महिन्यांनंतर मोरेला मारून राजांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला.

६ मे १६७५: छत्रपति शिवाजी महाराजांनी फोंडा जिंकला.

६ मे १९२२: राजातील माणूस आणि माणसातील राजा लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे निधन झाले.शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षण प्रसार करण्यावर भर दिला. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली.बहुजन समाजाला राजकिय निर्णयप्रक्रियेत समावून घेण्यासाठी त्यांनी इ स १९१६ साली निप्पाणी येथे ‘डेक्कन रयत असोसिएशन’ ही संस्था स्थापन केली. वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेला वेदोक्त संघर्ष शाहू महाराजांच्या काळात झाला. इ स १९१७ साली पुन्रविवाहाचा कायदा करुन विधी विवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. अस्पृष्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी इ स १९१९ साली सवर्ण व अस्पृष्याच्या वेगळ्या शाळा असण्याची पद्धत बंद केली. जातीभेद दुर करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला.अशा प्रकारे शाहूनी समाजात महत्वाचे बदल घडवून आणले.

९ मे १६६०: शास्ता उर्फ़ शाहिस्तेखान नगरवरुन निघून निरानदीच्या काठाकाठाने मजल-दरमजल करत पुण्याला पोचला आणि त्याने लालमहालावर कब्जा केला. शिवाजीराजे त्यावेळी पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकले होते. तर मराठा फौज विजापुर प्रांतात धाडी घालण्यात आणि वेढा फोडण्यात व्यस्त होती. ह्याचा फायदा घेउन खानाने पुणे – सासवड ताब्यात घेतले.

९ मे १६७४: शिवाजी महाराज चिपळूणहून रायगडावर परतले.

१० मे १८१८ रायगडावरचा शेवटचा रणसंग्राम !: रायगडावर इंग्रजांनी १ मे १८१८ या दिवशी हल्ला चढवला. कॅप्टन प्रॉथर हा नेतृत्व करीत होता. या वेळी गडाचा किल्लेदार होता अबुल फतेखान. आपलं सारं बळ एकवटून तो गडावरचा भगवा झेंडा सांभाळत होता. मराठे इंग्रजांना इरेसरीने टक्कर देत होते. पण अखेर दहाव्याच दिवशी म्हणजे १० मे १८१८ या दिवशी रायगडावर दारूगोळ्याचा प्रचंड स्फोट होऊन सारा गड धडाडून पेटला. वरून सूर्याची उन्हाळी आग , खालून इंग्रजांची तोफाबंदुकांची आग अन् गडावरही आगच आग. रायगड होरपळून गेला. शत्रू कॅ. प्रॉथर गडात शिरला. भयंकर अवस्था झाली होती रायगडाची. प्रॉथर गडात आला , तेव्हा एका खुरट्या लहानग्या झुडपाच्या लहानग्या सावलीत एक स्त्री बसली होती. ती होती शेवटच्या बाजीराव पेशव्यांची पत्नी. तिचं नाव श्रीमंत वाराणसी बाईसाहेब पेशवे. कॅ. प्रॉथर वाराणसीबाईसाहेबांशी अदबीने आणि आदराने वागला. त्याने त्यांना मेण्यातून सन्मानपूर्वक पुण्याकडे रवाना केले. ब्रह्माावर्त येथे स्थानबद्ध असलेल्या श्रीमंत दुसऱ्या बाजीराव पेशव्यांकडे नंतर वाराणसीबाईंची इंग्रजांनी रवानगी केली.
रायगडावर उरली फक्त राख. सारे वाडे , राजसभा आणि होतं नव्हतं ते जळण्यासारखं सारं जळून गेलं. सर्वात धडाडून जळालं असेल रायगडचं रक्षण करण्याकरता दहा दिवस झुंजलेल्या अबुल फतेखानचं आणि मराठी सैनिकांचं काळीज.
पुढच्या काळात रायगडाची सारी आबाळच होती.

११ मे १७३९: मराठा आणि पोर्तुगीज यांच्या मध्ये तहाची अंतिम बोलणी होउन पोर्तुगीज कायमचे गोव्याला निघून गेले.

१२ मे १६६६: शिवाजीराजे पालखीमध्ये बसून आग्रा दरबारामध्ये पोचले, दरबारामध्ये पहिली व शेवटची ‘ऐतिहासीक भेट’. त्यांच्या भोवती सशस्त्र १०० मावळे होते. पुरंदरच्या तहानुसार ५ मार्च १६६६ रोजी औरंगजेबाच्या ५०व्या वाढदिवसानिमित्त त्यास भेटण्यासाठी शिवाजी राजे राजग़डाहून आग्र्याला जायला निघाले होते. त्यांच्या सोबत होते ९ वर्षाचे शंभूराजे, सर्जेराव जेधे, हीरोजी फर्जद, निराजीपंत, मदारी मेहतर.

१३ मे १६७०: मराठ्यांनी मळवली जवळील लोहगड व विसापूर हे किल्ले एकाच दिवशी जिंकले.

१३ मे १६७४: इंग्रजांचा वकील हेन्री ऑक्झिंडेन मुंबईहून शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी रायगडास येण्यास निघाला. तो दि. १३ मे रोजी कोरलई जवळच्या आगरकोट या पोर्तुगीज ठाण्यात येऊन पोहोचला. आगरकोट हे ठिकान रेवदांडा,,जि. रायगड येथे आहे, त्याचेबरोबर आठ माणसे होती. त्यात एक श्यामजी नावाचा गुजराथी व्यापारी होता. राज्याभिषेकाचा मुहूर्त होता दि. ६ जून १६७४ . म्हणजे हेन्री खूपच लौकर निघाला होता का ? कारण त्याला ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापारीहिताची काही कामे शिवाजी महाराजांकडून मंजुरी मिळवून करावयाची होती.

हेन्री आगरकोटला दि. १३ मे रोजी दिवस मावळताना पोहोचला , तेव्हा आगरकोटाला असलेले प्रवेशद्वार म्हणजे वेस बंद झालेली होती. रहदारी बंद! हेन्रीला मुद्दाम ही वेस उघडून आत घेण्यात आले. तेव्हा त्याने आगरकोटच्या पोर्तुगीज डेप्युटी गव्हर्नरला सहज विचारले , की ‘ अजून दिवस पूर्ण मावळला नाही. तरीही आपण वेशीचे दरवाजे बंद का करता ? त्यावर डे. गव्हर्नरने उत्तर दिले की , ‘ अहो, तशी काळजी आम्हाला घ्यावीच लागते. कारण तो शिवाजी केव्हा आमच्यावर झडप घालील अन् आगरकोटात शिरेल याचा नेम नाही. म्हणून आम्ही ही दक्षता घेतो. यातच शिवाजी महाराजांचा दरारा आणि दहशत केवढी होती हे व्यक्त होते.

१३ मे १६७७: शिवाजी महाराजांनी जिंजी जिंकली.

१३ मे १८१८: दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीतल्या बहुतेक सर्व किल्ल्यांची तोड़फोड़ केली. त्यात इंग्रज अधिकारी ‘मॅन्रो’ ने वसंतगड जिंकला.

१४ मे १६५७ जेष्ठ शुध्द द्वादशी, गुरुवार,संवत्सर शके १५७९: छत्रपति संभाजीराजे यांचा सकल सौभाग्यसंपन्न वज्रचुडेमंडित साईंबाई राणीसाहेब यांचा पोटी किल्ले पुरंदर येथे दुपारी २ वाजता जन्म झाला व स्वराज्यास पहिला युवराज मिळाला. शिवाजी महाराजांचा मोठ्या भावाचे नाव संभाजी होते त्यांची हत्या अफजलखानाने दगाबजिने केलि होती. त्यांचा नावावरून याना संभाजी नाव दिले गेले.राजगडाची बांधणी पूर्ण होण्यापूर्वी स्वराज्याची पहिली राजधानी होण्याचा मान पुरंदर किल्ल्याला मिळाला असावा असा तर्क या घटनेवरून बांधता येतो. राजघराण्यातील महाराणी ज्या अर्थी पुरंदर किल्ल्यावरती प्रसूत होते, याचा अर्थ महाराजांचे निवासस्थान तात्कालीन कालखंडात पुरंदरावरती होते. पुरंदर बालेकिल्ल्याला दोन टेकड्या आहेत. एका टेकडीचे नाव आहे ‘केदारेश्वर’ तर दुसर्‍या टेकडीचे नाव आहे ‘राजगादी’.‘राजगादी’ हे नाव खूप सूचक आहे. या राजगादी टेकडीवरूनच शिवाजी महाराजांनी फत्तेखान व मुसेखान यांचा बेलसरजवळील पराभव आणि बाळाजी हैबतरावाचा शिरवळच्या सुभालमंगळावर फडशा पाडलेला होता.
या सर्व घटनांचे चिंतन केल्यास पुरंदर किल्ल्यास स्वराज्याच्या पहिल्या राजधानीचा मान मिळाला असल्याच्या तर्कास जागा मिळते.शंभूराजाना त्यांचा अयुशाची अवघी ३२ वर्षे मिळाली, त्यात छत्रपति पद त्याना अवघे ८ वर्षे लाभले (राज्याभिषेक १६. ०१. १६८१ व मृत्यु ११. ०३. १६८९) पण ही ८ वर्षे त्यानी अपल्या परक्रमाने अशी काही गाजवली की आजही ते एक शौर्यचे, त्यागाचे, बलिदानाचे मूर्तिमंत उदाहरण म्हनून ओलखले जातात. जगाचा इतिहासात अशी नोद आहे की शंभूराजे हें असे एकमात्र सेनानी होवून गेले आहेत की ज्यानी त्यांचा अयुशात जेवडया लढाया केल्या त्यासर्वात त्यानी विजय मीळावला होता. अपल्या छोट्याशा कार्यकाळात त्यानी मोगल, सिद्धि, इंग्रज, पोर्तुगीच, डच, व इतर अनेक आशा एकापेक्षा एक मातब्बर प्रतिस्पर्ध्यास नामोहरण केले होते. सर्वानी शंभू राजांचा पराक्रमापुढे हात टेकले होते.

अशा महापराक्रमी परमप्रतापी योध्या चरनी शतषा नमन.

१५ मे १७२९: मराठे शाहितिल पराक्रमी सेनापती खंडेराव दाभाडे यांचे निधन.

१५ मे १७३१: छत्रपति शाहूराजे (सातारा गादी) तळेगाव-दाभाडे येथे जाउन त्र्यंबक दाभाडे यांच्या मातोश्रींचे स्वांतन करण्यासाठी त्यांस भेटले. दाभाडे हे पेशवे थोरल्या बाजीरावांच्या हातून लढाईमध्ये मारले गेले होते.

१६ मे १६४०: शिवाजी राजांच्या फलटणच्या नाईक निंबाळकरांची लेक सईबाई यांच्याशी पुणे येथे विवाह.

१६ मे १६४९ (ज्येष्ठ पौर्णिमा): शिवाजी राजांनी फत्तेखानाचा व संभाजी राजांनी फर्रादखानाचा पराभव केला. शिवाजी राजांनी दिल्लीच्या मोगलांशी संधान साधून विजापूरकरांवर दबाव आणला. असे नाक दाबल्यावर, विजापूरकरांनी कैद केलेल्या शाहजी राजांना रिहा करण्याचा हुकूम सोडला व त्यांची सशर्त सुटका केली. त्या बदल्यात शिवरायांना सिंहगड विजापुरला परत द्यावा लागला.

१६ मे १६६५ मुरारबाजी देशपांडे यांना वीरमरण: दिलेरखानाने पुरंदरच्या बालेकिल्ल्यावर ५००० पठाण व बहलिये यांसह सुलतानढवा केला. हा हल्ला पाहून मुरारबाजी देशपांडे यांनी ७०० चिवट मराठी वाघांसह बालेकिल्ल्याचा दरवाजा उघडून मोगलांवर चाल केली. सर्वांचा जोश आगीसारखा भडकला होता. भयंकर रणधुमाळी उडाली. मुरारबाजींचा आवेश व हल्ला असा विलक्षण होता की जणू चक्र सुदर्शन ! पठाणांची खांडोळी उडवीत मुरारबाजींची ती प्रलयकारी झुंड दिलेरखानाच्या रोखाने घोंगावत येऊ लागली. गर्दी उडाली. मुरारबाजींचा हत्यारी सपाटा म्हणजे जणू रूद्राचे संतप्त तांडवच होते. मुरारबाजींचे शौर्य पाहून दिलेरखानाची उंगली तोंडात गेली. त्याने झुंज थांबवली. तो मुरारबाजींना म्हणाला,

“अय बहादुर ! तुम्हारी बहादुरी देखकर मै निहायत खूष हुवा हुँ ! तुम हमारे साथ चलो ! हम तुम्हारी शान रखेंगे !”
पण फितुरीचे अमिष पाहताच त्या इमानी अन् अभिमानी मुरारबाजींचा संतापाने भडका उडाला. त्यांनी खुद्द खानावरच चाल केली. तेव्हा खानाने सोडलेला तीर वर्मी लागून मुरारबाजी देशपांडे रणात कोसळले. पुरंदराच्या मांडीवर मुरारबाजींनी आपले प्राण स्वराज्यासाठी समर्पित केले.

आठवते का ? याच मुरारबाजी देशपांड्याना ऐन रणात जावळीच्या वनात महाराजांनी मागणी घातलेली होती ? तेव्हा मोर्‍यांच्या शिरपेचातील हा तुरा महाराजांना लाभलेला होता. आज याच मुरारबाजींना दिलेर खानाने ऐन रणात फितुरीचे आमिश दाखवले. पण मुरारबाजींच्या तोंडाला पाणी सुटण्या ऐवजी त्यांच्या तरवारीलाच खानाच्या रक्तासाठी पाणी सुटले.

१६ मे १७३९ – वसई मोहिम: पोर्तुगीच गव्हर्नर नो. द. कुन्या याने २० जानेवारी १५३३ ला गुजरातच्या बहादुरशहाचा सरदार मलिक तुग़लक याचा पराभव करुन वसई जिंकले. बहादुरशहाबरोबर वाटाघाटी करुन २३ डिसेंबर १५३४ ला वसई पोर्तुगिचानकड़े आली. तेथील स्थानिक जनतेने प्रथम त्यांचे स्वागत केले कारन मुघली सत्तेला ते वैतागले होते. पण पोर्तुगिचानी सक्तीचे धर्मांतर, मंदिरे उध्वस्त कर, हिन्दू पूजा व उत्सवाना बंदी सुरु केल्यानंतर तेथील जनतेने पेशव्यांपुढे आपली कैफियत मंडली. आणि त्यानंतर १७३७ साली पेशव्यानी मोहिम सूरू केलि.३० मे १७३७ वसईवर मराठयानी पहिला हल्ला केला पण फिरंग्यानी तो परतवून लावला. त्यानंतर ९ जून, २८ जून, ४ सप्टे. १९३७ हल्ला अयशस्वी राहिला.चिमाजी आप्पानी १९३९ च्या फेब्रुवारी ला वसईत तल ठोकला व ख-या अर्थाने लढाई सूरू झाली. अप्पांच्या कुशल नेतृत्वखाली मराठयानी जोरदार हल्ले केल्यानंतर ३० एप्रिलपासून वसईच्या शेवटास सुरवात झाली. मराठे किल्ल्यात घुसले. आखेर ४ मे १७९३ मधे फिरंग्यानी तहाचे निशान फडकावले आणि १६ मे १७३९ रोजी किल्ला मराठयांन कड़े सुपूर्द केला.

१७ मे १६६६: दि. १६ मे १६६६ या दिवशी बादशाहाने आग्र्याच्या कैदेत असताना शिवाजीराजांना ठार मारण्यासाठी शुजातखानाच्या नावाने फर्मान तयार करण्याचा हुकुम सोडला!त्याचे असे झाले की, दि. १६ मे रोजी औरंगजेबाचे काही महत्त्वाचे सरदार त्याची भेट घेण्यासाठी किल्ल्यात आले.त्यांचा मुद्दा एकच.या सीवाला ठार मारा.त्याने आपले अनेक अपराध केले आहेत. जहाँआरा बेगम ही बहीण.तिचा मुद्दा आणखीन वेगळा. ती म्हणत होती की,या सीवाने शाहिस्तेखानाची मुलगी पळविली. ती आपली मामेबहीण होती. याच सीवाने सुरतशहराचे मला मिळणारे जकातीचे उत्पन्न खलास करून टाकले. म्हणून याला ठार मारा. आणि खरोखरच औरंगजेबाने तिरीमिरीस यावे तसे येऊन म्हटले की, ‘ होय. मी सीवाला ठार मारणार आहे!’ हा त्याचा अचानक व्यक्त झालेला निर्णय ऐकताच सर्वजण क्षणभर विस्मितच झाले.बादशाहाने फर्मान तयार करण्याचा हुकुम सोडला. हे एक प्रकारे किल्ल्यात अगदी गुप्तपणे चालू होते.पण आश्चर्य असे की , ही भयंकर गोष्ट रामसिंगला त्याचे घरी समजली. तो कमालीचा बेचैन झाला.

त्याने तातडीने मिर्झा मोहम्मद अमीनखान मीरबक्षी या फार मोठ्या सरदाराकडे धाव घेतली. रामसिंगने
मीरबक्षीला कळवळून विनंती केली की , माझा अर्ज बादशाहांना आत्ताच्या आत्ता आपण जातीने जाऊन
सादर करावा. मीरबक्षीने त्याची विनंती खरोखरच मान्य केली. रामसिंगने बादशाहासाठी अर्ज लगेचतयार केला. दिला तो घेऊन मिर्झा किल्ल्यात गेला मग स्वत:च रामसिंग बादशाहाकडे का गेला नाही!त्याचे कारण बादशाहाची अशी अचानक भेट घेण्याचा अधिकार रामसिंगला नव्हता. तो चौथ्या दर्जाचा सरदार होता.

मीरबक्षीने बादशाहाला जातीने त्वरित भेटून रामसिंगचा अर्ज दिला. त्यात रामसिंगने असे म्हटले होते की,’ आपण शिवाजीराजांना ठार मारण्यासाठी फर्मान काढीत आहात. आपण सर्वशक्तीमान आहात.

आपण राजांना ठार मारू शकता. पण आम्ही शिवाजीराजांना शपथपूर्वक सुरक्षिततेचा शब्द दिला आहे. हा राजपुतांचा शब्द आहे , तरी आपण राजांना ठार मारणार असाल तर प्रथम मला ठार मारा. मग शिवाजीराजांना मारा. हा अर्ज पाहून बादशाह चपापलाच. त्यातील पहिली गोष्ट अशी की , सीवाला ठार मारण्यासाठी फर्मान तयार करण्यासंबंधीची बातमी येथून बाहेर पडलीच कशी ? रामसिंगला कळलीच कशी ? दुसरी गोष्टी अशी की , रामसिंग म्हणतो की , ‘ मला प्रथम ठार मारा. मग सीवाला ठार मारा ‘ याचा अर्थ असाही

उघडउघड दिसतोय की , मी जिवंत असेपर्यंत सीवाच्या अंगाला तुम्ही हात लावू शकत नाही. इथेच बादशाह चपापला. त्याने राजांना ठार मारण्यासंबंधीचे फर्मान थांबविले आणि मीरबक्षीला सांगितले की , ‘ रामसिंगला उद्या (दि. १७ मे) किल्ल्यात आम्हांस भेटावयास सांगा शिवाजीराजांचे तातडीने मरण बादशाहाने पुढे ढकलले. दि. १७ मे रोजी रामसिंग किल्ल्यात दिवाण-इ-खासमध्ये बादशाहास भेटावयास गेला. भेटला. बादशाह रामसिंगला म्हणाला, ‘ तुझा अर्ज मिळाला.मंजूर आहे. पण सीवा आमच्या परवानगीशिवाय आग्ऱ्यातून निघून जाणार नाही आणि कोणतेही घातपाती कृत्य करणार नाही अशी तू ग्वाही देतोस का ? तू या गोष्टीला जामीन राहतोस का ?प्रश्न भयंकरच अवघड होता. वादळाला जामीन राहण्यासारखेच होते हे. रामसिंग घरी आला. त्याने महाराजांना सर्व हकीकत सांगितली. महाराज ती ऐकून गंभीर झाले. बादशाहाचा आपल्याबाबतीतील डाव अगदी स्पष्ट झाला. महाराज शांतपणे उठले. त्यांनी रामसिंगबरोबर त्याच्या महालातील देवघरात प्रवेश केला. तेथील तुळसीबेल हातात घेतले. अन् देवाला वाहात त्यांनी रामसिंगला म्हटले ‘ भाईजी, तुम्ही
बादशाहांना जमानपत्र लिहून द्या. मी जमानपत्राप्रमाणे वागेन. ‘

१८ मे १६७५: मराठ्यांनी कारवार जिंकले.

१९ मे १६७४: शिवाजी महाराज रायगडहून प्रतापगडास निघाले. तेथील विराजमान झालेल्या आदिशक्ति तुळजा भवानीस १.२५ मण वजनाचे छत्रचामर अर्पण केले. तेथे ते ३ दिवस राहिले.

२० मे १६६५: राजगडाहून शिवाजी महाराजांचे वकिल रघुनाथपंत “पंडितराव” मिर्झा राजा जयसिंह यांच्याकडे (पुरंदर) तहासाठी रवाना केले.

२१ मे १६७४: राज्याभिषेकापूर्वी सोडलेला संकल्प प्रतापगडी पूर्ण करून शिवाजी महाराज रायगडावर परतले. आदिशक्ति छत्रचामरानी मंडीत करून झालेली होती. आता काही दिवसातच महाराज सिंहासनाभिषिक्त होणार होते.

२५ मे १६६२: शाईस्तेखानाचे दोन सरदार सरफराज खान व नामदार खान या दोघांनी नेताजी पालकरांचा सुप्याजवळील लढाईत पराभव केला व अल्पशी लूट मिळवली.

२६ मे १६४२: ‘शिवा जंगम’ या सद्गृहस्थास शिवबाने रायरेश्वर येथील शिवमंदिरात दैनंदिन पुजे अर्चेसाठी नेमले.

२८ मे १६६४: जसवंतसिंह राठोड व भावसिंह राणा हे दोन म्हेवणे सिंहगडाच्या पराभवाचे खापर एकमेकांच्या माथी फोडीत पुण्याहून दिल्लीकडे निघून गेले. सिंहगड स्वतंत्र राहिला.

२८ मे १६६८: शिवाजी महाराजांचा व फिरंग्यांचा कुडाळ येथे तह झाला.

२९ मे १६७४: राज्याभिषेक सोहळ्यापूर्वीच्या संस्काराचा एक भाग म्हणून शिवाजी महाराजांची रायगडावर मुंज झाली.

३० मे १६६४: जसवंतसिंह वेढा काढून दिल्लीला निघून जाताच शिवाजी राजे राजगडाहून सिंहगडावर आले. त्यांनी तो आपला अत्यंत प्रिय किल्ला नव्या कौतुकाने पाहिला.

३० मे १६७४: राज्याभिषेक सोहळ्या प्रीत्यर्थ संस्काराचा एक भाग म्हणून सोयराबाई, सकवार बाई, पुतळाबाई यांच्याशी शिवाजी महाराजांचा प्रतिकात्मक पुनर्विवाह करण्यात आला. राज्याभिषेक म्हणजे राजाचे भुमिशी लग्न. पण अभिषेका पुर्वी विवाह करावा असा धर्मसंकेत आहे. शिवकालात लग्ने बालपणीच होत असत. महाराजांना त्यांच्या वयास सांधर्म्य साधणारी मुलगी मिळणे अशक्य होते. पण म्हणून शिवरायांनी या ठिकाणी कुठल्याही लहान मुलिशी विवाह केलेला नाही. आता कळले का ? समर्थ शिवरायांना “आचारशिल – विचारशिल – सर्वज्ञ पणे सुशिल” असे का म्हणतात ? महाराज थोर विवेकी पुरूष होते !