मिथिला पालकरने साडीतील ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
मिथिला पालकरने साडीतील ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
मिथिला पालकरच्या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
एका युजरने लिहिले की, मला वाटते हवामान खात्याने सांगितल्यानुसार वातावरण बदलले आहे. पाऊस आणि इथे हॉट पाऊस पडतो आहे.
मिथिलाच्या या फोटोवर सुंदर, छान व अप्रतिम अशा कमेंट्स येत आहेत. एका युजरने म्हटले जुना फोटो टाकून ही बाई खूश करते आहे.
अभिनेत्री मिथिला पालकरने तिच्या दमदार अभिनयासह आपल्या बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाजाने रसिकांची मने जिंकली आहेत.
इरफान खानसोबत ‘कारवां’ सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
या सिनेमातील तिच्या भूमिकेचेही विशेष कौतुक झाले होते.
मराठीत मुरांबा या चित्रपटातून रसिकांना चांगलीच भुरळ पाडली.
मुरांबामधील मिथिला आणि अमेय वाघची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप भावली होती.
मिथिला अभिनेता अभय देओलसोबत नेटफ्लिक्सवरील सिनेमा ‘चॉपस्टिक’मध्ये झळकली होती.
मिथिलाने बऱ्याच जाहिरातीतही काम केले आहे.