कसदार अभिनय आणि आपल्या सौंदर्याने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलेल्या अभिनेत्री म्हणजे मृणाल कुलकर्णी. आजच्या तरुणींनाही लाजवेल असं त्यांचं सौंदर्य असून मराठी आणि हिंदीत त्यांनी अभिनयाचा ठसा उमटवलाय.

मृणाल कुलकर्णी यांच्या सोशल मीडियावरील अकाऊंटवर आपल्याला त्यांच्या पतीचे अनेक फोटो पाहायला मिळतात.
१० जून १९९० रोजी वयाच्या अवघ्या १९व्या वर्षी मृणाल कुलकर्णी यांचे लग्न झाले. मृणाल यांचे पती रुचिर कुलकर्णी हे व्यवसायाने वकील आहेत.
बारावीत शिकत असताना मृणाल यांनी ‘स्वामी’ या मालिकेत पहिल्यांदा काम केले होते.
सुरुवातीला अभिनयात करिअर करावे असे त्यांच्या डोक्यातही नव्हते. मात्र लग्न झाल्यानंतर खर्‍या अर्थाने अभिनय क्षेत्राकडे करिअर म्हणून पाहायला लागले, असे मृणाल यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं.
मृणाल कुलकर्णी यांनी हा फोटो काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर शेअर केला होता. हा फोटो मृणाल यांच्या लग्नातील आहे. या फोटोत मृणाल यांना ओळखताही येत नाही.
मृणाल कुलकर्णी यांच्या मुलाचे नाव विराजस असून माझा होशील ना या मालिकेत तो सध्या मुख्य भूमिका साकारत आहे.