मृण्मयी देशपांडेचा आज वाढदिवस असून तिने अनेक मराठी चित्रपट, मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.
मृण्मयी देशपांडेचा आज वाढदिवस असून तिने अनेक मराठी चित्रपट, मालिकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.
कट्यार काळजात घुसली’, नटसम्राट, ‘स्लॅमबुक’ सिनेमात मृण्मयी देशपांडे जबरदस्त परफॉर्मन्स दिला आहे.
मृण्मयीने ‘अग्निहोत्र’, ‘कुंकू’ यासारख्या मालिकांमधून घराघरातील रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवले आहे.
नाटक, सिनेमा आणि मालिका या तिन्ही माध्यमांत उत्तम अभिनय आणि वैविध्यपूर्ण भूमिका साकारत मृण्मयीने आपला वेगळा ठसा उमटवला आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून मृण्मयी नेहमीच फॅन्सच्या संपर्कात असते.
मृण्यमयीने फर्जंद सिनेमात साकारलेली भूमिका विशेष लक्षवेधी ठरली होती. या सिनेमात मृण्मयीने केसर नावाच्या कलावंतीणीची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी तिने बरीच मेहनत घेतली होती.
मृण्मयी देशपांडेने ‘मन फकीरा’ या सिनेमाच्या माध्यमातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले.
मृण्मयी ही मुळची पुण्याची असून तिचे सगळे शिक्षण देखील पुण्यात झाले आहे.
मृण्मयीला प्रचंड फॅन फॉलोव्हिंग असून तिचे चाहते तिला मोठ्या संख्येने सोशल मीडियावर फॉलो करतात.