मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात घर केले आहे.
मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात घर केले आहे.
भाग्यश्री मोटेचा मराठमोळ्या अंदाजातील फोटो चाहत्यांना भावतो आहे.
या फोटोत भाग्यश्रीने साडी नेसली आहे आणि मराठमोळ्या साजमध्ये दिसते आहे.
भाग्यश्री मोटेने छोट्या पडद्यावरून थेट ‘काय रे रास्कला’ या बिग बॅनर सिनेमाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले.
यानंतर ती ‘माझ्या बायकोचा प्रियकर’, ‘काय रे रास्कला’ अशा चित्रपटात दिसली होती.
भाग्यश्रीने तेलगू चित्रपट ‘चिकती गदीलो चिताकोटुडू’ या चित्रपटातून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही पदार्पण केले आहे.
यात तिने आपल्या मादक अदांचा जलवा दाखवला होता.
भाग्यश्री लवकरच तमीळ चित्रपटात झळकणार आहे.
या चित्रपटात ती बॅडमिंटनपटूची भूमिका साकारताना दिसणार आहे.
रुपेरी पडद्यावर जास्त वावर नसला तरी आपल्या फोटोंच्या माध्यमातून रसिकांना भुरळ पाडली आहे.