अभिनेत्री नेहा पेंडसे आज ३६वा वाढदिवस साजरा करते आहे.

अभिनेत्री नेहा पेंडसे मराठी शिवाय हिंदी मालिका व चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

मराठी बरोबरच हिंदीमध्ये ‘मे आय कमिंग मॅडम’ नंतर नेहा कॉमेडी किंग कपिल शर्माच्या शोमध्ये ‘प्रेझेंटर’म्हणून झळकली होती.

नेहाने आजवर मराठी आणि हिंदी सोडून दाक्षिणात्य भाषेत तसेच अन्य 7 विविध भाषांमध्ये काम केले आहे.

नेहा ही फिटनेसबाबतही तितकीच सजग आहे. बऱ्याचदा ती सोशल मीडियावर फोटो व व्हिडीओ शेअर करत असते.

वर्कआऊट करुन इतरांनाही त्याचे फायदे कळावेत यासाठी ती फिटनेस टीप्सही शेअर करत असते.

नेहा अभिनयासोबतच पोल डान्सही उत्तम करते. पोल डान्सचे फोटो आणि व्हिडिओ ती शेअर करत असते.

वेस्टर्न आऊटफिटप्रमाणेच पारंपरिक अंदाजातही नेहा खूप सुंदर दिसते.

No Text