Netaji Palkar (नेताजी पालकर)
Netaji Palkar (नेताजी पालकर)

नेताजी पालकर कोण आहे?

शिवराय आणि नेताजी पालकर नातलग आहेत मोगली अखबारातून असे उल्लेख मिळतात. महाराजांची पत्नी पुतळाबाई राणी साहेब यांचे पालकर घराण्यातले माहेरआहे. महाराजांची १ राजकन्या कमलाबाई हिचे लग्न जानोजी पालकरांशी झाले होते. परंतु पुतळाबाई आणि जानोजी हे नेताजीचे नेमके कोण हे फार मोठे प्रश्णचिन्ह अजूनही आहे.’छावा’ नुसार नेताजी पालकर हे महाराजांच्या एक महाराणी सगुणाबाई यांचे सख्खे काका होते.

नेताजींचे मूळचे गाव

नेताजी मूळचे पुणे जिल्ह्यातील शिरुर गावचे.

नेताजी पालकर यांना काय म्हंटले जायचे?

नेताजी पालकर हे दीर्घ काळ स्वराज्याचे सरनौबत होते. नेताजी पालकर यांना  ‘प्रतिशिवाजी’ म्हणजे ‘दूसरा शिवाजी’ असेही म्हटले जात होते. 


छत्रपती शिवाजी महाराज आणि नेताजी पालकर याच्यामध्ये वाद का झाला?

पुरंदर तहानंतर शिवराय, मिर्झा राजे, नेताजी पालकर व दिलेरखान विजापूरवर चालून गेले। तेथे  ते चौघे आदिलशाही सेनापति सर्जाखान याच्यासमोर अपयशी ठरत होते. व त्या अपयशाचे खापर दिलेरखान शिवाजीराजांवरच फोडू लागला. म्हणून विजापूरकरांचा पन्हाळगड जिंकण्या साठी शिवराय विजापुरहून परत आले, शिवरायांनी रात्रीच गडावर छापा घातला.आदिलशाही किल्लेदार बेसावध असेल अशी शिवरायांची खात्री होती परंतु आदिलशाही किल्लेदार सावध होता. त्यामध्ये नेताजी पालकर वेळेवर पोहोचून शिवरायांना कुमक पोहोचवू शकले नाहीत. यात महाराजांचा पराभव झाला व सुमारे एक हजार माणसे मारली गेली.महाराज नेताजींवर चिडले व त्यांनी नेताजीला पत्राद्वारे “समयास कैसा पावला नाहीस” असे म्हणून बडतर्फ केले होते.मग नेताजी विजापूरकरांना जाऊन मिळाले. शिवराय आग्र्याच्या भेटीस निघून गेल्यानंतर  नेताजी पालकरांना मिर्झाराजांनी विजापूरकरांकडून मोगलांकडे वळवले.

नेताजी पालकर पुन्हा स्वराज्यात का आले?

पुरंदरच्या तहानंतर शिवाजी महाराजांशी झालेल्या काही वादामुळे  त्यांना स्वराज्यापासून दूर जावे लागले होते तेव्हा त्यांनी मुघलांची चाकरी केली.पण पच्छाताप झाल्यामुले तब्बल नऊ वर्षांनी नेताजी पुन्हा स्वराज्यात आले. नेताजी पालकर आणि नेताजी पालकरांच्या भावाला मुघलान्नी जिवाची धमकी देऊन धर्म बदलण्यास प्रवृत्त केले होते. परंतु स्वराज्यात पुन्हा आल्यावर शिवरायांनी  पुन्हा योग्य विधि पार पाडून त्यांना हिन्दू धर्मात प्रवेश दिला होता.शिवरायांनंतर त्यांनी शंभूराजांचीही ही चाकरी केली होती.


नेताजी पालकरांच्या अटकेविषयीचे फर्मान!

शिवराय  जेव्हा आग्र्यातुन औरंगजेबाच्या कैदेतून सूटण्यात यशस्वी झाले तेव्हा शिवाजी सुटला आत्ता प्रतिशिवाजी सुटू नये या विचाराने नेताजी पालकरांच्या अटकेविषयीचे  औरंगजेबाने फर्मान दिनांक १९ ऑगस्ट १६६६ रोजी आग्रा येथून सोडले. नेताजी या वेळी मोगली छावणीत बीड नजीक धारुर येथे होते.दिनांक २४ ऑक्टोबर १६६६ या दिवशी मिर्झा राजे जयसिंह यांनी नेताजी व त्यांचे चुलते कोंडाजी यांना अटक केली होती. 

नेताजी पालकर मुसलमान झाले आणि  त्यांचे ‘महम्मद कुलिखान’ असे नामकरण करण्यात आले!

अटकेनंतर दिलेरखानाने त्यांना आग्र्याला पाठवायची व्यवस्था केली. ४ दिवसांच्या अतोनात हालानंतर नेताजी पालकर यांनी धर्मांतरास मान्यता दिली. दि.२७ मार्च १६६७ या दिवशी नेताजी पालकर मुसलमान झाले आणि त्यांचे ‘महम्मद कुलिखान’ असे नामकरण करण्यात आले.जून १६६७.नेताजी पालकर औरंगजेबाच्या हुकुमाप्रमाणे काबूल कंदाहाराच्या मोहिमेवर रवाना झाले होते. त्यांनी लाहोरजवळ आल्यावर पळून जाण्याचा एक अपयशी प्रयत्न केला होता. पुढे नेताजी पालकर ९ वर्षे काबूल कंदाहार येथेच मोहिमेवर होते.

नेताजी पालकर ९ वर्षानंतर मोगली छावणीतून पळून रायगडावर महाराजांकडे आले!

शिवाजी महाराजांसमोर औरंगजेबाचे सर्व सरदार अपयशी ठरत होते त्यावेळी औरंगजेबाला ‘प्रतिशिवाजीची’ आठवण झाली। बाटून ९ वर्षे उलटल्यावर नेताजी पक्का पाक झाला असे औरंगजेबाला वाटले. नंतर त्याने या ‘मुहंम्मद कुलीखानास’, महाराष्ट्रावर मोहिमेसाठी दिलेरखानासोबत पाठवले.मे १६७६. या दिवशी पच्छाताप झालेले नेताजी पालकर मोगली छावणीतून पळून रायगडावर शिवरायांकडे आले.१९ जून १६७६ या दिवशी  शिवाजी महाराजांनी त्यांना पुन्हा विधीवत हिंदू धर्मामध्ये घेतले.

नेताजी पालकर यांची समाधी

तामसा (तालुका .हदगाव, जि.नांदेड) येथे नेताजी पालकर यांची समाधी आहे.