शिव दिनविशेष: शिवाजी महाराजांचा काळातील विशेष तारखा व त्याची माहिती
१ नोव्हेंबर १६७६: संभाजी राजे हे धर्मपत्नी येसूबाईसाहेब यांच्यासह शृंगारपूरात येऊन राहिले
४ नोव्हेंबर १६६७: औरंगाबाद येथे संभाजी राजे व महाराजा जसवंतसिंह राठोड यांची भेट.
४ नोव्हेंबर १६७९: शिवाजी महाराजांनी मोगलांकडून जालना जिंकले.
१० नोव्हेंबर १६५९, गुरूवार.: प्रतापगडावर अफजलवध घडला.
१३ नोव्हेंबर १६६८: गोव्यात श्रीसप्तकोटीश्वराचे देवालय बांधण्यास प्रारंभ. श्रीसप्तकोटीश्वर हे अतिप्राचीन शिवालय गोमांतकात नारवे येथे आहे. आजुनही आहे. पोर्तुगिझांच्या गोव्यात या शिवालयाचे चर्च मध्ये बिनबोभाट रूपांतर झालेले होते. त्याचे पुन्हा हिंदु देवालयात शिवाजी महाराजांनी रूपांतर केले. समर्थांनी आनंदवनभुवनात लिहिले आहे, “मोडिली मांडिली क्षेत्रे, आनंदवनभूवनी !!” ते का लिहिले आहे आले का लक्षांत ?
१९ नोव्हेंबर १६६१: याच वेळी शिवाजी महाराजांचे सुमारे २००० स्वार जुन्नर परगण्यात खंडणी वसूल करीत आसल्याची खबर शाईस्तेखानाला पुण्यात समजली. म्हणून शाईस्तेखानाने जाधवराव, शेख हमीद, ईस्माईलखान, सैफ खान वगैरे सरदारांस जुन्नर व अंबेगाव परगण्यात रवाना केले. परंतु या सरदारांनी तिकडे जाऊन काय केले कोण जाणे ? त्यांची व मराठ्यांची गाठ पडल्याची नोंद Waqai of the Deccan मध्ये नाही.
१९ नोव्हेंबर १६६५: पुरंदरच्या तहानुसार शिवाजी महाराज सरनौबत नेतोजी पालकरसह ९००० फौज घेऊन मिर्झाराजांच्या कुमकेस विजापूरस्वारी साठी रवाना.
२० नोव्हेंबर १६७९: संभाजी राजे सहकुटुंब दिलेरखानाच्या छावणीतून पळाले.
२५ नोव्हेंबर १६६४: सिंधुदूर्गाच्या बांधकामाची मालवण नजिकच्या कुरटे बेटावर सुरूवात.
२८ नोव्हेंबर १६५९ (सोमवार): अफजल वधानंतर केवळ १८ दिवसांत शिवाजी महाराजांनी पन्हाळ्यासहित वाई ते कोल्हापूर पर्यंतचा मुलूख स्वराज्यात सामील.