शिव दिनविशेषशिवाजी महाराजांचा काळातील विशेष तारखा व त्याची माहिती

२ ऑक्टोबर १६७०: शिवाजी महाराज पुन्हा एकदा लुटीसाठी सुरते नजीक १५,००० फौजेनिशी धडकले.

३ ऑक्टोबर १६७०: द्वितीय सुरत लुट. प्रथम दिन.

४ ऑक्टोबर १६७०: द्वितीय सुरत लुट. द्वितीय दिन.

५ ऑक्टोबर १६७०: द्वितीय सुरत लुट. तृतीय दिन.

६ ऑक्टोबर १६७६: छत्रपति शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयास निघाले. या दिवशी दसरा होता.

९ ऑक्टोबर १६६७: पुरंदर तहातील कलमानूसार, संभाजी राजे शिवाजी महाराजांच्या हुकुमावरून औरंबादला मोगलांच्या छावणीत निसबतीसाठी निघाले.

१३ ऑक्टोबर १६७३: मराठ्यांनी वाईनजिकचा पांडवगड जिंकला. बाळाजी आवजींचा सातारा येथे पालखी देऊन महाराजांनी गौरव केला.

१६ ऑक्टोबर १६७०: सुरतेची लूट शिवाजी महाराज नेत असताना दाऊदखानाने त्यांचा चांदवड नजिक पाठलाग सुरू केला.

१७ ऑक्टोबर १६७०: दिंडोरी नजिक मोगलांनी (दाऊदखान) महाराजांना गाठले. लूट मार्गी लाऊन शिवाजी महाराज १०,००० फौजेसह मागे राहिले. फार मोठे युद्ध दाऊद खान व शिवाजी महाराज यांच्यात झाले. यात दाऊदखानाचा दणदणीत पराभव झाला.

२४ ऑक्टोबर १६५७: शिवाजी महाराजांनी कल्याण व भिवंडी काबीच केली.

२५ ऑक्टोबर १६७०: मोरोपंत पिंगळे पेशवे पंतप्रधान यांनी शिवनेरी जिंकण्यासाठी शिकस्त केली पण त्यात त्यांना अपयश आले. पण त्यांनी पुढे घुसून नाशिकजवळील ब्रह्मगिरी जिंकला.

२७ ऑक्टोबर १६६७: औरंगाबाद येथे संभाजी राजे व शाहजादा मुअज्जमची भेट. यावेळी संभाजी राजांच्या निसबतीस प्रतापराव गुजर सरनौबत, निराजी पंत, रावजी सोमनाथ, प्रल्हाद निराजी सबनीस इत्यादी मंडळी होती.

३१ ऑक्टोबर १६७९: संभाजी राजे व दिलेरखान यांची विजापूरला मोर्चे बांधणी. शिवाजी महाराज व मोरोपंत पिंगळे पंतप्रधान पेशवे विजापूरजवळ कुमक घेऊन पोहोचले.