Posted inMarathi

कालची बातमी खरी नाही

कालची बातमी खरी नाहीहाय, स्वर्गात भाकरी नाही देवदूता तुझा पगार किती?कां मला सांग नोकरी नही? तू मला घातलीस भीक जरीही तुझी मागणी बरी नाही येथली ही सर्व घरे माझीसांग, मी कोणत्या घरी नाही? मागता काय लेखणी माझी..ही कुणाचीच बासरी नाही! एकट्याचाच हा सवाल नसेआग ही कोणत्या उरी नाही? राहिले काय पूर्णिमेत अता?चंद्र माझा उशीवरी नाही! […]

Posted inMarathi

केव्हातरी पहाटे

केव्हातरी पहाटे उलटून रात्र गेली मिटले चुकून डोळे हरवून रात्र गेली कळले मला न केव्हा सुटली मिठी जराशी कळले मला न केव्हा निसटून रात्र गेली सांगू तरी कसे मी वय कोवळे उन्हाचे?उसवून श्वास माझा फसवून रात्र गेली! उरले उरात काही आवाज चांदण्याचे..आकाश तारकांचे उचलून रात्र गेली! स्मरल्या मला न तेव्हा माझ्याच गीतपंक्ती मग ओळ शेवटाची सुचवून रात्र गेली! […]

Posted inGeneral

मनातल्या मनात मी तुझ्यासमीप राहतो !

मनातल्या मनात…. मनातल्या मनात मी तुझ्यासमीप  राहतो !तुला न सांगता तुझा वसंत रोज पाहतो ! अशीच रोज नाहुनी, लपेट उन्ह कोवळे,असेच चिंब केस, तू उन्हात सोड मोकळे; तुझा सुगंध मात्र मी इथे हळूच हुंगतो ! अशीच रोज अंगणी, लवून वेच तू फुले, असेच सांग लाजुनी, कळ्यांना गुज आपुले; तुझ्या कळ्या, तुझी फुले इथे टिपून काढतो! अजून तू अजाण […]

Posted inMarathi

नेहमीच ! तू समुद्र निर्विकार नेहमीच!

नेहमीच ! तू समुद्र निर्विकार नेहमीच! मी तरंग ! मी तुषार नेहमीच ! काय हे खरेखुरे असेल प्रेम ? भेटती दुकानदार नेहमीच ! चांदण्याविना कुणी न अंगणात . वाजते लबाड दार नेहमीच ! प्रश्न मी विचारले दिशेदिशेस येत राहिले नकार नेहमीच! लाख टाळले तरी टळे न भेट, भेटतो तुझा विचार नेहमीच ! तू जपून बोलतेस […]

Posted inMarathi

व्यर्थ, सुर मागू तुला मी कसा?

व्यर्थ, सुर मागू तुला मी कसा? जीवना तू तसा, मी असा! तू मला, मी तुला पाहिले, एकमेकांस न्याहाळिले; दुःख माझातुझा आरसा! एकदाही मनासारखा तू न झालास माझा सखा, -खेळलो खेळ झाला जसा! खूप झाले तुझे बोलणे, खूप झाले तुझे कोपणे, मी तरीही जसाच्या तसा! रंग सारे तुझे झेलुनी, शाप सारे तुझे घेउनी -हिंडतो मी वेडापिसा! […]

Posted inMarathi

गे मायभू

गे मायभू तुझे मी फेडीन योग सारे,आणीन आरतीला हे सूर्य, चंद्र, तारे. आई, तुझ्यापुढे मी आहे अजून तान्हा:शब्दात सोडमाझ्या आता हळूच पान्हा, आई. तुझ्यापुढे ही माझी व्यथा कशाला?जेव्हा तुझ्यामुळे या जन्मास अर्थ आला । मी पायधुळ घेतो जेव्हा तुझी जराशी, माझी ललाटरेषा बनते प्रयाग काशी।आई. तुझी अशी मी गाईन रोज गाणी माझी तुझ्या दुधाने गेली […]

Posted inMarathi

किर्र रात्री सुन्न रात्री झर्र वारा भुर्र पानी;

किर्र रात्री सुन्न रात्रीझर्र वारा भुर्र पानी;शार वाडा गार भिंती,दार त्याचे हस्तिदंती. कोण आले ? कोण आले ?दार आपो-आप खोले !आली आली भुताबाई;तीन माणसे रोज खाई स्मशानामध्ये घालते फेरीपहाटेपूर्वी करते न्हेरीन्हेरीसाठी होतात चट्‍टदोन पोरे लठ्‍ठ मठ्‍ठ पण प्रत्येक एकादशीसरताळ्याचा खाते कीस.किर्र रात्री सुन्न रानीझर्र वारा भुर्र पानी; शार वाडा गार भिंतीदार त्याचे हस्तिदंती.कोण आले ? […]

Posted inMarathi

कारे नाडवीसी | आपुल्या मनासी

कारे नाडवीसी | आपुल्या मनासी ;पोषितो कुणासी ?| जगी कोण ?महारोग्यापोटी | पोरांची खिल्लारे ;जीवन तया रे | कोण देतो ? कोणे केली बाळा | दु:खाची उत्पत्तीवाढवी श्रीपती | पाप-पुण्यकोणी दिली भूक ? | कोणे दिले रोग?दारिद्र्याचे भोग दिले कोणी ?दु:खाच्या अनंता | भोगितो संसार ;येई भागाकार | आत्मरुपे.आत्म्याचे हे गुह्य | ब्रह्माला ना ठावे […]

Posted inPhotos

जन्माच्या गाठी… अभिनेत्री शुभांगी सदावर्तेच्या लग्नाचे हे सुंदर फोटो एकदा पाहाच

अभिनेत्री शुभांगी सदावर्ते नुकतीच संगीतकार आनंद ओकसोबत लग्नबेडीत अडकली आहे. लग्न सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ‘संगीत देवबाभळी’ या संगीत नाटकातील आवलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री शुभांगी सदावर्ते व आनंद ओक यांचा प्रेमविवाह आहे. ११ जुलै रोजी विवाह पार पडला. शुभांगी आणि आनंद ओक यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहे. या दोघांनी अगदी […]

Posted inPhotos

साडीत प्रचंड सुंदर दिसते अभिनेत्री तेजश्री प्रधान, पाहा तिचे साडीतले कधी न पाहिलेले फोटो!

छोटा पडदा आणि मोठ्या पडद्यानंतर हिंदी तसंच मराठी रंगभूमीवरही तेजश्री प्रधानने छाप पाडली आहे. (PHOTO INSTAGRAM) हिंदी असो किंवा मराठी नाट्य रसिक तेजश्रीच्या अभिनयावर फिदा आहेत. (PHOTO INSTAGRAM) झी मराठीवरील होणार सून मी या घरची या मालिकेतून अभिनेत्री तेजश्री प्रधान ही महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली. (PHOTO INSTAGRAM) सध्या ती ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारतेय. […]