मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अंकुश चौधरीने विविध भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात घर केले. अंकुशची पत्नी दिपा परब ही देखील मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अंकुश चौधरीने विविध भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात घर केले. अंकुशची पत्नी दिपा परब ही देखील मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
अंकुश आणि दिपाने 2007 साली लग्न केले. ते दोघे त्यांच्या संसारात प्रचंड खूश असून त्यांना प्रिन्स नावाचा मुलगा देखील आहे.
अंकुश आणि दिपा यांची लव्ह स्टोरी खूपच इंटरेस्टिंग आहे. त्यांनी तब्बल दहा वर्षं एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न केले.
दिपा आणि अंकुश यांचा २३ नोव्हेंबर 2006 रोजी साखरपुडा पार पडला. अंकुश आणि दिपा या दोघांनीही त्यांचा साखरपुडा झाल्याचे सगळ्यांपासून लपवून ठेवले होते. मीडियाला देखील याविषयी अनेक दिवसांनंतर कळले.
अंकुश आणि दिपा एकमेकांना कॉलेज दिवसांपासून ओळखत होते.कॉलेजमध्ये असताना ते दोघेही एकांकिकामध्ये काम करत असत. त्याचदरम्यान त्यांच्यात मैत्री झाली आणि या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले.
करियर केल्यानंतरच लग्न करायचे त्यांनी ठरवले होते. अभिनय क्षेत्रात नाव कमावल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
केदार शिंदेच्या ऑल द बेस्ट या नाटकात अंकुश आणि दिपाने एकत्र काम देखील केले आहे. त्यानंतर दिपा परब आपल्याला अनेक जाहिरातींमधून आणि मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली. तसेच दिपाचा प्रसाद ओक आणि सुबोध भावे सोबतचा क्षण हा सिनेमा अधिक लोकप्रिय ठरला.
दिपा लग्नानंतर खूपच कमी चित्रपटात आपल्याला पाहायला मिळते. शेवटची ती अंड्याचा फंडा या चित्रपटात झळकली होती.