बिग बॉस मराठी शोमधून घराघरात पोहचलेली अभिनेत्री सई लोकूर सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत आहे.

बिग बॉस मराठी शोमधून घराघरात पोहचलेली अभिनेत्री सई लोकूर सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत आहे.

काही दिवसांपूर्वी सईने तिच्या लव्ह लाइफबद्दल सांगितले होते. मात्र तिने त्या व्यक्तीचा पाठमोरा फोटो शेअर केला होता.

त्यामुळे तिचे चाहते या व्यक्तीबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक होते. त्यात आज सईने साखरपुड्याचे फोटो शेअर करून सर्वांना चकीत केले.

तिच्या भावी पतीचे नाव आहे तीर्थदीप रॉय आहे. आज सई लोकूर आणि तीर्थदीप रॉयचा साखरपुडा पार पडला.

सईने या सोहळ्यातील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. सई लोकूरच्या या फोटोंवर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे.

सई लोकूरचा भावी नवरा तीर्थदीप कोणत्या क्षेत्रात कार्यरत आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही.

अभिनेत्री सई लोकुर ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वात स्पर्धक होती. ती घरात शंभर दिवस राहून ग्रँड फिनालेपर्यंत पोहोचली होती. या शोमधून ती घराघरात पोहचली.

सईने तिच्या अभिनयातील कारकीर्दीची सुरूवात तिची आई वीणा लोकूर यांचे दिग्दर्शन असलेला चित्रपट मिशन चॅम्पियनमधून केली होती.

या चित्रपटात तिच्यासोबत मोहन जोशी मुख्य भूमिकेत होते.

२०१५ साली तिने किस किसको प्यार करूँ या चित्रपटातून हिंदी सिनेसृष्टीत पाऊल ठेवले. या चित्रपटाचे दिग्दर्शन अब्बास मस्तान यांनी केले आहे. या चित्रपटात तिच्यासोबत कपिल शर्मा, सिमरन कौर मुंडी व एली अवराम मुख्य भूमिकेत होते.