मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा उर्फ अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर छाप उमटविली आहे.

मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा उर्फ अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर छाप उमटविली आहे.

सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर सक्रीय असून ती चाहत्यांच्या संपर्कात असते.

नुकतेच सोनालीने नवे फोटोशूट इंस्टाग्रामवर शेअर केले आहे.

सोनाली कुलकर्णीच्या नव्या फोटोशूटची सर्वत्र चर्चा होताना दिसते आहे.

सोनाली कुलकर्णीने स्टायलिश अंदाजात फोटोशूट केले आहे.

सोनालीच्या ग्लॅमरस अदांवर चाहते फिदा झाले आहेत.

सध्या सोनाली डान्सिंग क्वीन शोमध्ये परिक्षकाच्या भूमिकेत दिसते आहे.

मराठीसोबत हिंदी सिनेमातही सोनालीने आपल्या अभिनयाने आणि मेहनतीने स्थान मिळवलं आहे.

सोनाली शेवटची धुरळा चित्रपटात झळकली होती.

सोनालीने यावर्षी साखरपुडा करत चाहत्यांना गोड बातमी दिली होती. कुणाल बेनोडेकरशी सोनालीचा दुबईत साखरपुडा पार पडला.

लॉकडाऊन काळात सोनाली दुबईतच अडकली होती. दुबईत होणारा पती कुणाल बेनोडेकरसोबत काही महिने राहिल्यानंतर सोनाली नुकतीच मुंबईला परतली आहे.