मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्याने अभिनेत्री अमृता खानविलकरने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. अमृता खानविलकर सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे. अमृता सोशल मीडियाच्या माध्यमातून बऱ्याचदा चाहत्यांशी संवाद साधते आणि फोटो व व्हिडीओ शेअर करत असते. नुकतेच अमृता खानविलकरने पांढऱ्या रंगाच्या साडीतील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अमृताच्या पांढऱ्या रंगाच्या साडीवर मरून रंगाची डिझाईन आहे. या साडीवर तिने कानात झुमके घातले आहेत. अमृता या साडीत खूपच सुंदर दिसते आहे. अमृताने हे फोटो शूट समुद्र किनारी केले आहे. अमृताच्या या साडीतील फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. साडीतील अमृता खानविलकरच्या मनमोहक अदा चाहत्यांना खूप भावल्या आहेत. अमृता खानविलकरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर शेवटची ती चोरीचा मामला या चित्रपटात झळकली होती. No Text PHOTOS: अमृता खानविलकर साडीत दिसतेय ग्लॅमरस, पाहा तिचे स्टायलिश फोटोमराठमोळ्या अभिनेत्रींनी स्वीकारले ‘Black and White’ चॅलेंज, पाहा फोटोअभिनेत्री अमृता खानविलकरच्या दिलखेच अदांवर चाहते झाले फिदा, फोटोंवरुन हटणार नाही तुमची नजर