त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.
नुकतेच दोघांनी सोशल मीडियावर संगीत सेरेमनीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
यावेळी दोघेही खूप छान दिसत होते.
त्यांच्या संगीत सेरेमनीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.
पुण्यातील ढेपेवाडीत सिद्धार्थ व मितालीचा लग्नसोहळा थाटामाटात पार पडला.
या लग्नसोहळ्याला मराठी कलाविश्वातील अनेक मराठी सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.
अभिनेता उमेश कामत, अभिज्ञा भावे, पूजा सावंत, भूषण प्रधान असे अनेक सेलिब्रिटी यावेळी हजर होते.
दोन वर्षांपूर्वी व्हॅलेंटाइन डेला पहिल्यांदा सिद्धार्थने इन्स्टाग्राम पोस्टमधून आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. त्यानंतर त्याच वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात सिद्धार्थने मितालीला प्रपोज केले होते.