कधी अप्सरा तर कधी हिरकणी अशा विविध भूमिका सक्षमपणे साकारणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. 
कधी अप्सरा तर कधी हिरकणी अशा विविध भूमिका सक्षमपणे साकारणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. 
लॉकडाउनमुळे सर्व कलाकार घरात आपल्या कुटुंबासोबत वेळ व्यतित करत आहे.
सोनाली देखील घरात आहे. मात्र ती सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी संवाद साधत असते.
नुकताच तिने साडीतील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोत ती खूपच सुंदर दिसते आहे.
सोनाली कुलकर्णीने तिच्या साखरपुड्याचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत २ फेब्रुवारीला मी कुणाल बेनोडेकरसोबत साखरपुडा केला असे सांगितले आहे.
सोनालीने काल तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिच्या फॅन्सना एक खूप चांगले सरप्राईज दिले. सोनलीचा फेब्रुवारीत साखरपुडा झाला असून तिने हीच घोषणा सोशल मीडियाद्वारे तिच्या चाहत्यांसाठी केली.
सोनालीने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘आमचा २ फेब्रुवारी २०२० ला साखरपुडा झाला आणि आमचा हा आनंद तुम्हा सगळ्यांसोबत वाटण्यासाठी आजच्यापेक्षा योग्य दिवस असूच शकत नाही असं मला वाटतं… आपले शुभाशीर्वाद कायम पाठीशी असू द्या…’
सोनाली कुणालसोबत नात्यात असल्याची तिने काही महिन्यांपूर्वी कबुली दिली होती. त्यानंतर सोनाली आणि कुणाल लग्न कधी करतायेत याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना लागलेली होती.
सोनालीने साखरपुड्याविषयी सांगितल्यानंतर तिचे फॅन्स खूप खूश झाले असून सोशल मीडियाद्वारे ते तिला भरभरून शुभेच्छा देत आहेत.
No Text