‘क्षणभर विश्रांती’ या सिनेमातून तिने मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं होतं. यानंतर ‘आता गं बया’, ‘झकास’, ‘सतरंगी रे’, ‘दगडी चाळ’, ‘नीळकंठ मास्तर’ अशा अनेक मराठी सिनेमात वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. मराठी रसिकांची मनं जिकंल्यानंतर थेट बॉलिवूडमध्येही एंट्री केली. ‘जंगली’ या हिंदी सिनेमातून पूजा रसिकांच्या भेटीला आली होती. अभिनेता विद्युत जामवालसोबत ती ‘जंगली’ सिनेमात झळकली आहे. पूजा सावंत सोशल मीडियावरही बरीच अॅक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्सशी संवाद साधत असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती त्यांच्यासह शेअर करत असते. सोशल मीडियावर सध्या तिच्या फोटोने नेटीझन्सचे लक्ष वेधून घेतले आहे. तलावात झोपून तिने फोटोशूट केल्याचे पाहायला मिळतंय. पूजा सावंतच्या या आगळ्या वेगळ्या फोटोशूटची चांगलीच चर्चा रंगली आहे. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठीमराठमोळी ही अभिनेत्री आहे मराठी सिनेइंडस्ट्रीतून गायब, सध्या करतेय हे काम‘बुगडी माझी सांडली गं’ फेम मानसी मोघे आहे मराठी सिनेइंडस्ट्रीतून गायब, जाणून घ्या तिच्याबदद्ल