प्राजक्ता माळीने आपल्या अभिनयाने रसिकांची मने जिंकली आहेत. छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा प्राजक्ताच्या अभिनयावर रसिक फिदा आहेत. प्राजक्ता माळी सोशल मीडियावरून चाहत्यांना प्रत्येक अपडेट देत असते. सध्या ती हिमाचल प्रदेशमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करण्यासाठी गेली आहे. ही माहिती खुद्द तिनेच सोशल मीडियावर दिली आहे. तसेच प्राजक्ता माळी हिने या व्हॅकेशनचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोत ती तिच्या फ्रेंड्ससोबत धमालमस्ती करताना दिसते आहे. प्राजक्ता माळीला जुळून येती रेशीमगाठी या मालिकेमुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली. तिने यानंतर हम्पी, डोक्याला शॉट यांसारख्या चित्रपटात खूप चांगल्या भूमिका साकारल्या. सध्या प्राजक्ता छोट्या पडद्यावरील कॉमेडी शो ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’चे सूत्रसंचालन करताना दिसते आहे. मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या ग्लॅमरस अदांनी पाडली चाहत्यांना भुरळ, पहा तिचे फोटोStunning! मराठमोळ्या प्राजक्ता माळीचा ग्लॅमरस लूक पाहून व्हाल खल्लास, पहा फोटोसाडीत खुलून आलंय प्राजक्ता माळीचे सौंदर्य, पाहा हे फोटो