मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने फिऑन्से कुणाल बेनोडेकरसोबतचे रोमँटिक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये सोनालीने आकाशी रंगाचा गाऊन परिधान केला आहे. कुणाल बेनोडेकर तिचा हात पकडून तिला प्रपोज करतानाचा हा क्युट फोटो आहे. लॉकडाऊन सुरु होण्याच्या आधीच म्हणजेच 2 फेब्रुवारी रोजी सोनालीने कुणाल बेनोडेकरशी आपल्या कुटुंबियांच्या उपस्थितीत दुबईमध्ये साखरपुडा केला होता. तिच्या साखरपुड्याला आज 6 महिने पुर्ण झाल्याच्या निमित्ताने सोनालीने कुणालसोबत एक रोमँटिक फोटो शेअर आपला आनंद व्यक्त केला आहे. दुबईच्या वाळवंटात हे फोटोशूट करण्यात आल्याचे या फोटोवरुन दिसत आहे. “हा तो दिवस आहे ज्या दिवशी मी कुणालला हो बोलले,” असे कॅप्शन सोनालीने या फोटोखाली दिले आहे. कुणाल बेनोडेकर हा दुबई येथे चार्टर्ड अकाउंटंट आहे. मिडल ईस्ट, आफ्रिका आणि आशिया पॅसिफिक मधील भागात कुणाल काम करतो. मागील अनेक वर्ष कुणाल आणि सोनाली एकमेकांना डेट करत आहेत. अद्याप सोनालीने लग्नाची तारिख किंवा लग्नानंतर शिफ्ट होणार का याविषयी मौन बाळगले आहे. दिवाळीसाठी सोनाली कुलकर्णीची स्पेशल नऊवारी, साडी न्यारी अन् तिची स्टाईल पण लयभारी!काळ्या रंगाच्या साडीत सोनाली कुलकर्णी दिसतेय झक्कासPHOTOS: सोनाली कुलकर्णीच्या साडीतील ग्लॅमरस अदा पाहून चाहते म्हणाले – लय भारी..!