कोणत्याही भूमिकेला न्याय देण्याचे कसब अभिनेत्री रसिका सुनील हिच्याकडे आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. नेहमीच तिचा ग्लॅमरस आणि मॉर्डन अंदाज सोशल मीडियावरील फॅन्सना घायाळ करत असतो. रसिकाने नुकताच ग्रीन आऊटफिटमधील फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती खूप बोल्ड दिसते आहे. तिचा हा किलर लूक तिच्या चाहत्यांना भावतो आहे. तिच्या या फोटोवर कमेंट्सचा व लाइक्सचा वर्षाव होतो आहे. रसिका सोशल मीडियावर एक्टिव्ह आहे. ती इंस्टाग्रामवर नेहमी फोटो शेअर करत असते. बऱ्याचदा ती बोल्ड व ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेतही येते. रसिका सुनीलने छोट्या पडद्यावरील ‘माझ्या नव-याची बायको’ मालिकेत शनाया ही भूमिका साकारली होती. शनाया भूमिकेमुळे तिला खूप लोकप्रियता मिळाली होती. मालिकेत तिची निगेटीव्ह भूमिका असली तरी आपल्या खास अंदाजात तिने ही भूमिका साकारली होती. तिच्या भूमिेकला रसिकांचीही भरघोस पसंती मिळाली होती. तिचा मालिकेतील अल्लडपणा रसिकांना चांगलाच भावला होता. मात्र पुढील शिक्षणासाठी शनाया अर्थात रसिकाने ही मालिका सोडली आणि ती अमेरिकेत गेली. अमेरिकेत रसिका शिक्षणासोबत विविध गोष्टी करताना पहायला मिळते. ती सोशल मीडियावरून आपल्या चाहत्यांना तिथले अपडेट्स देत असते. लाल रंगाच्या गाऊनमध्ये रसिका दिसली बोल्ड, फोटोंवर चाहत्यांनी केला लाईक्सचा वर्षावलाल रंगाच्या गाऊनमध्ये रसिका दिसली बोल्ड, फोटोंवर चाहत्यांनी केला लाईक्सचा वर्षावमॉर्डन ड्रेसमध्ये दिसणारी रसिका पारंपरिक अंदाजामध्ये आणखीनच दिसते सुंदर, पाहा तिचा फोटो अल्बम