प्रत्येकाचा फॅशन फंडा वेगवेगळा असतो. प्रत्येकाची आपली स्टाईल असते. अभिनेत्री प्रार्थनाची एक वेगळी स्टाईल आहे.
प्रत्येकाचा फॅशन फंडा वेगवेगळा असतो. प्रत्येकाची आपली स्टाईल असते. अभिनेत्री प्रार्थनाची एक वेगळी स्टाईल आहे.
कॉफी आणि बरंच काही, मिस्टर एंड मिसेस सदाचारी, मितवा, मस्का अशा विविध मराठी सिनेमातून आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणारी अभिनेत्री प्रार्थना बेहरे सोशल मीडियावर सक्रीय आहे आणि ती सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी संवाद साधत असते.
तसेच ती सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते. प्रार्थना तिच्या ट्रेडिशनल लूकमधले फोटोशूट इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसते आहे.
प्रार्थनच्या फॅन्सनी या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
प्रार्थना सध्या आपल्याला खूपच कमी चित्रपटांमध्ये काम करताना दिसत आहे. ती तिच्या कुटुंबाला पहिले प्राधान्य देत असून जास्तीत जास्त वेळ हा तिच्या पतीसमवेत घालवत आहे.
प्रार्थनाचा पती अभिषेक जावकर हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध डिस्ट्रीब्युटर आहे. त्याने काही चित्रपटाचे दिग्दर्शनदेखील केले आहे.
‘डब्बा एैस पैस’, ‘सॉल्ट आणि प्रेम’ यांसारख्या मराठी चित्रपटांची त्याने सहनिर्मिती देखील केली आहे.
प्रार्थनाने याआधी ‘पवित्र रिश्ता’ मालिकेतून छोटा पडदा गाजवला. त्यानंतर ‘जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा’ या मराठी सिनेमातून एंट्री मारत रसिकांची मनं जिंकली.
मालिका आणि रुपेरी पडद्यावर आपल्या अभिनयाने रसिकांवर जादू केलीच आहे.
No Text