अभिनेत्री रिंकू राजगुरू सध्या लंडनमध्ये असून आगामी चित्रपट छूमंतरचे शूटिंग करते आहे.

अभिनेत्री रिंकू राजगुरू सध्या लंडनमध्ये असून आगामी चित्रपट छूमंतरचे शूटिंग करते आहे.

रिंकूने या चित्रपटातील तिच्या लूकचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

यात रिंकू राजगुरू खूप ग्लॅमरस दिसते आहे.

या चित्रपटात रिंकूसोबत प्रार्थना बेहरे आणि सुव्रत जोशी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर जोशी करत आहेत.

छूमंतर चित्रपटाच्या निमित्ताने रिंकू राजगुरू पहिल्यांदाच लंडनमध्ये शूटिंग करते आहे.

याबद्दल रिंकूने सांगितले की, मुंबई ते लंडन हा माझा प्रवास एक्सायटमेंटने भरलेला होता. दोन्ही विमानतळावर योग्य ती काळजी घेतली जात होती हे पाहून खूप समाधान वाटले.

रिंकूचे चाहतेदेखील छूमंतरबद्दल जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक आहेत.

प्रार्थना बेहरे, सुव्रत जोशी यांच्यासोबत रिंकू राजगुरूला रुपेरी पडद्यावर काम करताना पाहणे कमालीचे ठरणार आहे.

रिंकू राजगुरू शेवटची हंड्रेड या वेबसीरिजमध्ये झळकली होती.

हंड्रेडमध्ये रिंकूसोबत लारा दत्ता मुख्य भूमिकेत होती.

याशिवाय रिंकू राजगुरू अमिताभ बच्चन यांच्या झुंड चित्रपटात दिसणार आहे.