मानसी नाईक नुकतीच बॉयफ्रेंड प्रदीप खरेरासोबत लग्नबेडीत अडकली आहे. मानसी आणि प्रदीप एकमेकांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. मानसी आणि प्रदीप वाटेवरी मोगरा या रोमँटिक म्युझिक अल्बममध्ये दिसणार आहेत. वाटेवरी मोगरा या म्युझिक अल्बमची निर्मिती सागरीका म्युझिकने केली आहे. हे गाणे वैशाली सामंत आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरसाजात सजले आहे. No Text गेल्या काही वर्षांमध्ये सागरीकाच्या अनेक व्हिडिओज मध्ये झळकलेली मानसी नाईक आता पूर्णपणे नवीन अवतारात “वाटेवरी मोगरा”मध्ये दिसणार आहे. मानसी नाईकचा आत्तापर्यंतचा हा पहिलाच रोमँटिक म्युझिक व्हिडिओ आहे. नवीनच लग्न झालेल्या मानसी सोबत तिचा नवरा प्रदीप खरेरा यात तिच्यासोबत असल्यामुळेच हा म्युझिक व्हिडीओ अजूनच खास झाला आहे. यावर्षी १९ जानेवारीला मानसी ने प्रदीप खरेराशी लग्न केले आणि या म्युझिक व्हिडिओतून ते पहिल्यांदाच एकत्रित दिसणार आहेत. १२ मार्चला सागरिका म्युझिकच्या मराठी यूट्यूब चॅनेलवर वाटेवरी मोगरा हे गाणे रिलीज होणार आहे. IN PICS : प्रदीपच्या या गुणांवर भाळली मानसी नाईक, अशी आहे लव्हस्टोरीमानसी नाईकने बॉयफ्रेंडसोबत केले रोमँटिक फोटोशूट, फोटो पाहून म्हणाल – रब ने बना दी जोडी!मानसी नाईकने नवरा प्रदीप खरेरासोबत शेअर केले फोटो, दिसले रोमँटिक मूडमध्ये