साता जन्माच्या गाठीत अडकली अभिनेत्री सई लोकुर. अभिनेत्री सई लोकुर शुभमंगल पार पडलं आहे. अभिनेत्री सई लोकुर शुभमंगल पार पडलं आहे. तीर्थदीप रॉयसह ती रेशीमगाठीत अडकली आहे. नववधू सई लोकुरचा अंदाज कुणालाही घायाळ करणारा असल्याचे पाहायला मिळत आहे. नववधू सई लोकुरच्या विविध अदा, लग्नातील धम्माल मस्ती या फोटोत पाहायला मिळतेय. लग्नानंतर सईचा नवीन प्रवास सुरू झाला आहे. त्यामुळे ती खूप उत्सुकही आहे. साजश्रृंगार केलेल्या सईचा हा लूक रसिकांनाही तितकाच भावतो आहे. पारंपरिक पद्धतीने या दोघांचा विवाह सोहळा पार पडला, बंगली आणि महाराष्ट्रीयन पद्धीतीने हे लग्न संपन्न झाले. तिचे अनेक चाहते या फोटोंना लाईक्स कमेंट करत येणा-या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत आहेत. सईने लग्नात फुल ऑन धम्माल मस्ती करत आपला आनंद व्यक्त करत आहे.