आपल्या अदा, स्टाईल, लूक आणि तितकाच हॉट अंदाज यामुळे सई ताम्हणकर मराठी सिनेइंडस्ट्रीत ओळखली जाते. सई सोशल मीडियावर नेहमीच ॲक्टिव्ह असते. तिचे विविध फोटो आणि व्हिडीओ ती नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या खाजगी आयुष्यात काय सुरू आहे, ती कुठे फिरतेय ही ती तिच्या चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगत असते. अभिनेत्री सई ताम्हणकर ही आज मराठीतील आघाडीच्या अभिनेंत्रीपैकी एक आहे. तिने आजवर दुनियादारी, बालक पालक यांसारख्या अनेक चित्रपटात दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. सई लवकरच लक्ष्मण उतेकर यांच्या मिमी सिनेमात दिसणार आहे. मराठीतल्या ‘मला आई व्हायचंय’ या चित्रपटावर आधारित हा चित्रपट आहे. या सिनेमात क्रिती सॅनन आणि पंकज त्रिपाठी यांच्याही मुख्य भूमिका आहे. काही महिन्यांपूर्वी सई या सिनेमाच्या शूटिंगसाठी राजस्थानला गेली होती. #HappyBirthdaySaiTamhankar ट्विटरवर होतोय ट्रेंड, पहा सई ताम्हणकरचे फोटोसई ताम्हणकरचे हे सेक्सी फोटो पाहून तुम्ही व्हाल क्लिन बोल्ड, पाहा तिचे Unseen Bold फोटोसई ताम्हणकरच्या बोल्ड बघताना हटणार नाही तुमची नजर