मूळची अकलूजची असलेल्या रिंकूनं आपल्या अभिनयाने साऱ्यांनाच तोंडात बोटं घालायला लावली आहेत.
मूळची अकलूजची असलेल्या रिंकूनं आपल्या अभिनयाने साऱ्यांनाच तोंडात बोटं घालायला लावली आहेत.
असं असलं तरी आर्चीची एक अशी गोष्ट आहे जी ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.
बालपणी अकलूजमध्ये विविध कार्यक्रमांमध्ये रिंकूने सहभाग घेतला.
यांत गाणी किंवा नृत्याच्या कार्यक्रमाचा समावेश होता.
मात्र आजवर रिंकूने कोणतंही नाटक पाहिलेलं नाही.
अकलूजमध्ये कोणत्याही नाटकाच्या स्पर्धा किंवा नाटकांचं आयोजन करण्यात आलं नसल्याने ती नाटकांपासून आजवर दूरच आहे.
त्यामुळेच की काय तिने नाटकात कधी सहभाग घेतला नाही किंवा नाटक पाहिलंही नाही.
मध्यंतरी एक कलाकार म्हणून नाटक पाहण्याची रिंकूची इच्छा व्यक्त केली होती.
नाटक हा प्रकार जाणून घेण्याची तिला उत्सुकता असल्याचे सांगितले होते.
तिने मराठी नाटक लवकरच पाहावं आणि एखाद्या मराठी नाटकातून रंगभूमीवरही आपल्या अभिनयाची जादू दाखवावी अशीच इच्छा तिच्या फॅन्सची असेल.