4 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या सैराटमध्ये लक्षवेधी ठरली ती परशा आणि आर्चीची जोडी. सैराटमध्ये आर्ची साकारणारी रिंकू राजगुरू तर भलतीच भाव खाऊन गेली.
4 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या सैराटमध्ये लक्षवेधी ठरली ती परशा आणि आर्चीची जोडी. सैराटमध्ये आर्ची साकारणारी रिंकू राजगुरू तर भलतीच भाव खाऊन गेली.
आर्चीचा प्रत्येक डायलॉग, तिचं ट्रॅक्टर किंवा बुलेट चालवणं, परशावरील प्रेम असा प्रत्येक अंदाज रसिकांना भावला. त्यामुळेच सैराटमधील आर्ची अवघ्या महाराष्ट्राची लाडकी बनली.
अभिनेत्री रिंकू राजगुरू सध्या लॉकडाऊनमुळे तिच्या मूळ गावी अकलूजला आहे.
मात्र ती सोशल मीडियावर एक्टिव्ह असून चाहत्यांशी संवाद साधत असते.
सैराट चित्रपटानंतर रिंकूला अनेक ऑफर्स आल्या.
यानंतर ती कागर, मेकअप या मराठी सिनेमांमध्ये दिसली.
त्यानंतर ती नुकतीच हंड्रेड या हिंदी वेबसीरिजमध्ये झळकली.
यात लारा दत्ताही मुख्य भूमिकेत होती.
हंड्रेडमध्ये रिंकूने नेत्राची भूमिका साकारली होती. तिच्या या भूमिकेचे खूप कौतूक झाले होते.
याशिवाय रिंकूकडे आणखीन काही प्रोजेक्ट्स आहेत. मात्र याबद्दल आता सांगणे उचित ठरणार नसल्याचे ती म्हणाली.
लवकरच रिंकू बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत झळकणार आहे. या चित्रपटाचं नाव आहे झुंड.
या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळे करत आहे.
या चित्रपटाच्या काही भागांचे शूटिंग अद्याप बाकी आहे. पण अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करायला मिळणार या आनंदापेक्षा रिंकूसाठी तिचे शिक्षण सर्वात जास्त महत्त्वाचे वाटत आहे.
रिंकूला सिनेइंडस्ट्रीत तर खूप काम करायचे आहे पण सर्वात आधी तिला तिचे शिक्षण पूर्ण करायचे आहे
No Text