काहे दिया परदेस या मालिकेत गौरीची भूमिका साकारणाऱ्या सायली संजीवने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. काहे दिया परदेस या मालिकेमुळे सायली संजीव हे नाव आज घराघरात पोहोचले. सायली संजीवने या मालिकेत झळकण्याआधी काही चित्रपटांमध्ये काम केले होते. काहे दिया परदेस ही मालिका संपल्यानंतर तिने गुलमोहर या मालिकेत काम केले होते. परफेक्ट पती या हिंदी मालिकेत तिला जया प्रदा सारख्या प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत काम करण्याची संधी मिळाली सायली तिच्या कामाच्या निमित्ताने सध्या मुंबईत राहात असली तरी ती मुळची नाशिकची आहे. सायलीचे बालपण नाशिकमध्ये गेले आहे. ती अभिनेत्री होईल असा तिने कधी विचारदेखील केला नव्हता. सायली प्रियांका चोप्रासोबतदेखील एका जाहिरातीमध्ये झळकली होती. सोशल मीडियावर सायली खूप सक्रिय असते आपले फोटो आणि व्हिडीओ ती फॅन्ससोबत शेअर करत असते. अभिनेत्री सायली संजीवचं साडीतील सौंदर्य पाहून म्हणाल झक्कास!हे मराठी स्टार्स नावापुढे लावत नाही आडनाव, काय आहेत या कलाकारांची आडनावं?मराठमोळ्या अभिनेत्रींनी स्वीकारले ‘Black and White’ चॅलेंज, पाहा फोटो