अभिनेत्री नेहा महाजनने मराठी चित्रपटसृष्टीत 'कॉफी अॅण्ड बरेच काही', 'निळकंठ मास्तर' व 'वन वे तिकिट' या मराठी सिनेमात नेहाने काम केले आहे
अभिनेत्री नेहा महाजनने मराठी चित्रपटसृष्टीत ‘कॉफी अॅण्ड बरेच काही’, ‘निळकंठ मास्तर’ व ‘वन वे तिकिट’ या मराठी सिनेमात नेहाने काम केले आहे
मराठी, तमीळ व इंग्रजी सिनेमात विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे.
मराठी इंडस्ट्रीत नेहा महाजनला सगळ्यात बोल्ड अभिनेत्री समजले जाते.
बोल्ड, हॉट आणि सेक्सी असलेली ही अभिनेत्री तितकीच हुशारही आहे.
सोशल मीडियावर ती बरीच सक्रीय असून ती तिच्या प्रोजेक्टविषयी माहिती आणि तिचे ग्लॅमरस फोटो तिच्या चाहत्यांसह शेअर करत असते.
नेहाला अभिनयासोबतच सतार वादनाचीदेखील आवड आहे हे खूप कमी लोकांना माहिती आहे.
नेहाचे वडील पंडित विदुर महाजन हे प्रसिद्ध सतार वादक आहेत.
वडिलांना सतार वाजवताना पाहून नेहा देखील या वाद्याच्या प्रेमात पडली. वडिलांसोबत नेहा कार्यक्रमात सहभाग घेते.
काही महिन्यांपूर्वी नेहा बँकॉकमध्ये बॉलिवूड अभिनेता रणदीप हुडासोबत शूटिंग करत होती
तिने ही माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या फॅन्सना दिली होती.