शशांक केतकरची पत्नी आहे खूप ग्लॅमरस, फोटो पाहून म्हणाल- क्या खूब लगती हो, बडी सुंदर दिखती हो..!Sonali KulkarniJune 8, 2020Photos अभिनेता शशांक केतकरची पत्नी प्रियांका ढवळे- केतकरच्या ग्लॅमरस फोटोंची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. प्रियांकानं फोटो शेअर केल्यानंतर ती शशांकसोबत सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे का? अशा चर्चा सुरू आहेत. प्रियांकानं शेअर केलेल्या या ग्लॅमरस फोटोंना चाहत्यांची पसंती मिळत असून अनेक इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचे हे फोटो शेअर करण्यात आलेत. प्रियंकादेखील इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत असते. प्रियंकाच्या फोटोंवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होत असतो. तसेच प्रियंका व शशांकचे फोटोदेखील सोशल मीडियावर पहायला मिळतात. प्रियांका आणि शशांक यांनी लग्न केल्यानंतर इन्स्टाग्रामवर प्रिशा फॅनक्लब नावाने पेज तयार केलं. व्यवसायानं वकील असलेली प्रियांका आणि शशांक गेली अनेक वर्ष एकमेकांना ओळखत होते. त्यानंतर वर्ष २०१७मध्ये दोघं विवाहबंधनात अडकले. शशांक आणि प्रियांका यांचा चाहता वर्ग मोठा असून सोशल मीडियावर दोघांचे बरेच फॅन पेजेस आहेत. No Text प्रियंका व शशांकची केमिस्ट्री खूप छान वाटतो. Facebook Twitter Pinterest LinkedIn Next Post हॅपी बर्थ डे मुक्ते...!! पाहा, वेड लावतील मुक्ता बर्वेचे हे काही खास फोटो