कुणाल बेनोडेकरशी सोनालीचा दुबईत साखरपुडा पार पडला. यावेळी सोनालीचा मराठमोळा शृंगार सगळ्यांच्या डोळ्यांत भरला.
कुणाल बेनोडेकरशी सोनालीचा दुबईत साखरपुडा पार पडला. यावेळी सोनालीचा मराठमोळा शृंगार सगळ्यांच्या डोळ्यांत भरला.
स्वत: सोनालीने साजशृंगाराचे हे फोटो शेअर केले आहेत.
कुठल्याही सिनेमासाठी, जाहिरातीसाठी नाही, कार्यक्रमासाठी नाही तर हा श्रृंगार आहे माझ्या साखरपुड्यासाठी.. असे कॅप्शन तिने या फोटोंना दिले आहे.
या फोटोंमध्ये सोनालीने पिवळ्या रंगाची कांजीवरम साडी नेसलेली आहे.
गळ्यांत पारंपरिक दागिने आणि केसांत गजरा माळलेला आहे.
एका फोटोत सोनाली तिच्या आईवडिलांसोबत दिसत आहे.
सोनालीचा होणारा नवरा कुणाल हा कामानिमित्त दुबईत राहतो.
कुणाल हा मूळचा लंडनचा असून तो दुबईत एएस इंटरनॅशनलमध्ये काम करतो.
कुणालचे शिक्षण लंडनमधल्या मर्चंट्स टेलर स्कूलमध्ये झाले असून त्याच्या फेसबुक अकाऊंटला आपल्याला त्याचे अनेक फोटो पाहायला मिळतात.
ते दोघे अनेक महिन्यांपासून नात्यात असले तरी त्यांनी सोशल मीडियावर कधीच एकमेकांचे फोटो शेअर केले नाहीत.