सोनाली कुलकर्णीने तिच्या साखरपुड्याचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत २ फेब्रुवारीला मी कुणाल बेनोडेकरसोबत साखरपुडा केला असे सांगितले आहे.
सोनाली कुलकर्णीने तिच्या साखरपुड्याचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत २ फेब्रुवारीला मी कुणाल बेनोडेकरसोबत साखरपुडा केला असे सांगितले आहे.
सोनालीने काल तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिच्या फॅन्सना एक खूप चांगले सरप्राईज दिले. सोनलीचा फेब्रुवारीत साखरपुडा झाला असून तिने हीच घोषणा सोशल मीडियाद्वारे तिच्या चाहत्यांसाठी केली.
सोनालीने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘आमचा २ फेब्रुवारी २०२० ला साखरपुडा झाला आणि आमचा हा आनंद तुम्हा सगळ्यांसोबत वाटण्यासाठी आजच्यापेक्षा योग्य दिवस असूच शकत नाही असं मला वाटतं… आपले शुभाशीर्वाद कायम पाठीशी असू द्या…’
सोनाली कुणालसोबत नात्यात असल्याची तिने काही महिन्यांपूर्वी कबुली दिली होती. त्यानंतर सोनाली आणि कुणाल लग्न कधी करतायेत याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना लागलेली होती. सोनालीने साखरपुड्याविषयी सांगितल्यानंतर तिचे फॅन्स खूप खूश झाले असून सोशल मीडियाद्वारे ते तिला भरभरून शुभेच्छा देत आहेत.
सोनाली आणि कुणालने अतिशय साधेपणाने केवळ जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत दुबईत साखरपुडा केला होता.
कुणाल हा मूळचा लंडनचा असून तो दुबईत एएस इंटरनॅशनलमध्ये काम करतो.
कुणालचं शिक्षण लंडनमधल्या ‘मर्चंट्स टेलर स्कूल’मध्ये झालं असून त्याच्या फेसबुक अकाऊंटला आपल्याला त्याचे अनेक फोटो पाहायला मिळतात.
त्यानंतर कुणालने ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पोलिटिकल सायन्स’मधून उच्च शिक्षण घेतलं. कुणालचे फेसबुक अकाऊंट पाहिले असता त्याला फिरायला खूप आवडते असे नक्कीच म्हणता येईल.
सोनाली कामात कितीही व्यग्र असली तरी वेळात वेळ काढून ती दुबईला कुणालला भेटायला नेहमी जाते. ते दोघे अनेक महिन्यांपासून नात्यात असले तरी त्यांनी सोशल मीडियावर कधीच एकमेकांचे फोटो शेअर केले नाहीत.