सोनाली कुलकर्णी आणि मयूर वैद्य यांचे उत्कृष्ट परीक्षण आणि अद्वैत दादरकरच्या खुमासदार सूत्रसंचालनामुळे शोने अल्पावधीतच रसिकांची पसंती मिळवली आहे. नेहमीप्रमाणे सोनालीचा अंदाज रसिकांना अधिक भावतो आहे. ‘नटरंग’ या चित्रपटातील अप्सरा आली हे तिचे गाणे प्रचंड गाजले होते. या चित्रपटानंतर तिला मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सराच म्हटले जाते. त्यामुळे तिला मोठ्या संख्येने तिचे चाहते मोठ्या प्रमाणावर फॉलो करतात. नुकताच सोनालीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ आणि फोटो शेअर केले आहेत. फोटो शेअर करत तिने समर्पक अशी कॅप्शनही दिली आहे. यांतून नाशीशक्तीचा संदेश दिल्याचे पाहायला मिळते आहे. व्हिडीओ तुम्हालाही नक्कीच वेड लावल्याशिवाय राहणार नाही. सोनालीच्या या व्हिडीओ आणि फोटोला सोशल मीडियावर बरीच पसंती मिळत आहे. फॅन्सकडून या व्हिडीओवर कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे. सोनालीच्या या लूकवरही चाहत्यांची नजर हटत नसून फिदा होत असल्याचे पाहायला मिळतंय. काळ्या रंगाच्या साडीत सोनाली कुलकर्णी दिसतेय झक्कासदिवाळीसाठी सोनाली कुलकर्णीची स्पेशल नऊवारी, साडी न्यारी अन् तिची स्टाईल पण लयभारी!साडीत खुलून आलंय अप्सरेचे सौंदर्य, पाहा सोनाली कुलकर्णीचे हे खास फोटो