मराठी वाहिन्यांवरील पुरस्कार सोहळ्यात हिंदी गाण्यांवर थिरकणारे मराठी कलाकार तुम्ही पाहिले असतीलच. यावर अनेकदा टीका होते. पण याविरोधात बोलण्याची वा याला विरोध करण्यात फार कुणी धजावत नाही. पण अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने मात्र कधीच हा निर्णय घेतला आहे.

मराठी वाहिनीवरील पुरस्कार सोहळा कार्यक्रमात हिंदी गाण्यांवर नृत्य करणे बंद केले आहे. यापुढेही करणार नाही, असा निर्णय सोनालीने कधीच घेतला आहे.

याबाबतचे वृत्त व्हायरल झाले. एका चाहत्याने खुद्द सोनालीलाच याबाबत विचारले. ‘मराठी वाहिनीवरील पुरस्कार सोहळा कार्यक्रमात हिंदी गाण्यांवर नृत्य करणे बंद केले आहे. यापुढेही करणार नाही, ही बातमी खरी असेल तर तुम्हाला शुभेच्छा,’ असे एका युजरने सोनालीच्या अकाऊंटवर कमेंट बॉक्समध्ये लिहिले. यावर ‘केव्हाच केलंय,’ असे उत्तर सोनालीने दिले.

मराठी वाहिनीवरील पुरस्कार सोहळा कार्यक्रमात हिंदी गाण्यांवर नृत्य थिरकणार नाही, हे सोनालीने जाहीर करताच सध्या तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय.

सोनालीने यावर्षी साखरपुडा करत चाहत्यांना गोड बातमी दिली होती. कुणाल बेनोडेकरशी सोनालीचा दुबईत साखरपुडा पार पडला.

लॉकडाऊन काळात सोनाली दुबईतच अडकली होती. दुबईत होणारा पती कुणाल बेनोडेकरसोबत काही महिने राहिल्यानंतर सोनाली नुकतीच मुंबईला परतली आहे.

सोनालीचा होणारा नवरा कुणाल हा कामानिमित्त दुबईत राहतो. कुणाल हा मूळचा लंडनचा असून तो दुबईत एएस इंटरनॅशनलमध्ये काम करतो.

कुणालचे शिक्षण लंडनमधल्या मर्चंट्स टेलर स्कूलमध्ये झाले असून त्याच्या फेसबुक अकाऊंटला आपल्याला त्याचे अनेक फोटो पाहायला मिळतात.