अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे सौंदर्य आणि फॅशन जितके शानदार आणि तितकेच मोहक आहेत. यात कोणतीही शंका नाही. सर्व प्रकारच्या ट्रेडिशनल अवतारात ती अधिक सुंदर दिसते. पण जेव्हा सोनाली साडी नेसते तेव्हा ती अधिक सुंदर दिसते. सोशल मीडियावर सोनाली कुलकर्णी नेहमीच अॅक्टिव्ह असते. ती आपल्या फॅन्ससोबत नेहमीच वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते. नुकताच सोनालीने लाल रंगाच्या साडीतला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत सोनालीने सौंदर्य आणखी खुलून आले आहे. सोनाली आपल्या लूक, स्टाइल आणि फॅशनाबाबत नेहमीच जास्त सजग असते. फोटोत तिने साडी परिधान केली असून नाकात नथ, कपाळावर टीकली असा साजश्रृंगार केलेला पाहायला मिळत आहे. याआधीही तिने आपल्या सोज्वळ अंदाजाने रसिकांना घायाळ केले आहे. नेहमप्रमाणेच या फोटोत सोनालीचे स्मित हास्य, डोळ्यात नवं तेज आणि चेहऱ्यावर प्रचंड आत्मविश्वास दिसत आहे. जरतारी लाल साडीत सोनाली कुलकर्णीच्या मोहक अदा फोटोवरून हटणार नाही नजरहे फोटोज् पाहून विश्वास बसणार नाही 46 वर्षांची आहे सोनाली कुलकर्णी, दिसते फारच ग्लॅमरससोनाली कुलकर्णीने दाखवले तिचे अॅब्स, फिटनेस पाहून चाहते झाले थक्क