अप्सरा आली म्हणत तिने मराठी रसिकांवर जादू केली आहे. विविध सिनेमातून वेगवेगळ्या भूमिका साकारत सोनालीने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे.

अप्सरा आली म्हणत तिने मराठी रसिकांवर जादू केली आहे. विविध सिनेमातून वेगवेगळ्या भूमिका साकारत सोनालीने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे.

सोनाली कुलकर्णी ‘डान्सिंग क्वीन साईज लार्ज-फुललार्ज’ या डान्स रिअ‍ॅलिटी शोमध्ये परिक्षक म्हणून आहे.

याच शोमध्ये सोनालीने मराठी कार्यक्रमांममध्ये हिंदी गाण्यांवर नृत्य न करण्याचा तिचा निर्णय जगजाहिर केला.

सोनाली कुलकर्णी तिच्या सोशल मीडियावरील ग्लॅमरस फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते.

सोशल मीडियाच्या माध्यामतून ती आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते आणि चाहत्यांशी संवाद साधत असते.

सोनालीने नुकतेच साडीतले फोटोशूट शेअर करत सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.

बकुळा नामदेव घोटाळे या चित्रपटाद्वारे सोनालीने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते.

लवकरच सोनाली थ्री चिअर्स टू’सिनेमामध्ये हेमंत ढोमे आणि संतोष जुवेकरसोबत दिसणार आहे . लोकेश विजय गुप्ते या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत.

सोनालीला मराठी इंडस्ट्रीतील अप्सरा म्हटले जाते.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी कुणाल बेनोडेकरसोबत या वर्षी लग्न बेडीत अडकणार आहे.