अभिनेत्री सोनाली खरे हिने चित्रपट, मालिका व नाटक माध्यमातून रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे. सोनाली सोशल मीडियावर सक्रिय असते. सोनाली तिच्या आगामी प्रोजेक्ट्स व सोशल मीडियावरील फोटोंमुळे चर्चेत येत असते. लॉकडाऊनच्या काळात अनेक योगासन करतानाचे फोटो सोशल मीडियावर सोनाली शेअर करत असते. मराठी तसेच हिंदी चित्रपटात काम केलेला अभिनेता बिजय आनंदसोबत सोनालीने लग्न केले आहे. बिजय आणि सोनाली यांची भेट ‘रात होने को है’ या मालिकेदरम्यान झाले होते. सोनानी काही महिन्यांपूर्वी तिचे WOW नावाचं युट्यूब चॅनेल सुरु केले आहे. या चॅनेलच्या माध्यमातून ती हेल्थ, वेलनेस व फिटनेसशी निगडीत सल्ले प्रेक्षकांना देत असते. सोनाली शेवटची हृद्यांतर चित्रपटात झळकली. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. Sonalee Kulkarniच्या मराठमोळ्या लूकला मिळतेय चाहत्यांची पसंती, पाहा फोटो‘मेरे देश की धरती..!’, सोनाली कुलकर्णीचा देसी लूक भावतोय चाहत्यांना, पहा फोटोPHOTOS: सोनाली कुलकर्णीच्या साडीतील ग्लॅमरस अदा पाहून चाहते म्हणाले – लय भारी..!