अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा नो मेकअप लूक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा नो मेकअप लूक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
सोनाली कुलकर्णीने कुणालसोबतच्या ‘मिनिमून’चे फोटो शेअर केले आहेत.
कोरोना व्हायरसमुळे प्रत्येक देशाने काहीतरी निर्बंध लावले आहेत. असे असताना सोनाली आणि कुणाल यांनी फिरण्याची हौस पूर्ण केली आहे
सोनाली आणि कुणाल पूर्व आफ्रिकेत गेले आहेत. तिथले फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
यात सोनाली आणि कुणालचा रोमँटिक अंदाज पहायला मिळतो आहे.
सोनाली कुलकर्णीने ७ मे रोजी दुबईत कुणाल बेनोडेकरसोबत लग्न केले.
या लग्नाला सोनालीच्या घरातल्यांनी भारतातून तर कुणालच्या कुटुंबाने लंडनमधून ऑनलाइन उपस्थिती लावली होती.
सध्या सोनाली कुलकर्णी नवऱ्यासोबत दुबईत आहे.
ती सोशल मीडियावर फिटनेसचे व्हिडीओ शेअर करताना दिसते.
तसेच वर्कआउट करतानाचे फोटोदेखील सोनाली शेअर करत असते.
सोनाली कुलकर्णी आणि कुणाल बेनोडेकरची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते.