आपल्या सौंदर्याने आणि ग्लॅमरस अदांनी अनेकांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. सोनालीच्या अभिनयासोबतच तिच्या डान्सचे आणि तिच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहेत. सोशल मीडियावर मोठ्या संख्येने तिचे चाहते तिला फॉलो करतात. नुकतेच सोनाली कुलकर्णीने जांभळ्या रंगाच्या कांजीवरम साडीतील फोटो शेअर केले आहेत. सोनाली कुलकर्णीने हे फोटो शेअर करत लिहिले की, एक ज़रतारी, गर्द जांभळी,कांजीवरम साडी… आणि एक मी …. तसेच तिने या फोटोंची तुलना चक्क कॅडबरी डेरिमिल्कच्या रॅपरसोबत केली आहे. या साडीवर सोनालीने गळ्यात घातलेल्या सिल्व्हर नेकलेसने तिच्या सौंदर्याला चारचाँद लावले आहेत. तिच्या साडीतील या फोटोंना चाहत्यांची खूप पसंती मिळते आहेत आणि हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सोनाली आपल्या लूक, स्टाइल आणि फॅशनाबाबत नेहमीच जास्त सजग असते. याआधीही तिने आपल्या सोज्वळ अंदाजाने रसिकांना घायाळ केले आहे. ‘मेरे देश की धरती..!’, सोनाली कुलकर्णीचा देसी लूक भावतोय चाहत्यांना, पहा फोटोकाळ्या रंगाच्या साडीत सोनाली कुलकर्णी दिसतेय झक्काससोनाली कुलकर्णी आणि कुणाल बेनोडेकरचा ‘मिनिमून’, अभिनेत्रीचा नो मेकअप लूक होतोय व्हायरल