स्वप्नील जोशी आणि तेजस्विनी पंडितची आगामी वेबसीरिज समांतर १ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजमध्ये स्वप्नील जोशी, तेजस्विनी पंडित यांच्यासोबत नीतीश भारद्वाज आणि सई ताम्हणकर प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. ‘समांतर २’ मध्ये स्वप्नील जोशी आणि तेजस्विनी पंडितचे बोल्ड सीन पाहायला मिळणार आहेत. ‘समांतर २’च्या सेटवरचे काही फोटो स्वप्नील जोशी आणि तेजस्विनी पंडितने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. ‘समांतर’च्या पहिल्या सीझनमध्ये बोल्ड सीनमुळे चर्चेत आलेली तेजस्विनी पुन्हा एकदा ‘समांतर २’ मध्ये बोल्ड सीन करताना दिसणार आहे. या शोच्या पहिल्या सीझनचे दिग्दर्शन सतीश राजवाडे यांनी केले होते. तर, ‘समांतर २’ चे दिग्दर्शन समीर विद्वांस करत आहेत. ‘समांतर २’ वेबसीरिज मराठीसह हिंदी, तमिळ आणि तेलुगू या भाषेमध्ये प्रदर्शित होणार आहे. अभिनेत्री मृण्मयी देशपांडेचा नवरा आहे बिझनेसमॅन, पहिल्याच नजरेत पडला होता तिच्या प्रेमातएक लाजरान् साजरा मुखडा..! अभिनय ते राजकारण असा प्रवास करणाऱ्या दिपाली सय्यदचे फोटोमानसी नाईकच्या मेहंदी सेरेमनीतमध्ये या अभिनेत्रीने वेधले लक्ष, लाल लेहंग्यात दिसली इतकी सुंदर