मॉडेलिंगमधून आपल्या करियरची सुरूवात करणारी अभिनेत्री प्रणाली भालेराव मुंबईतील मुलूंड येथे राहणारी आहे.
मॉडेलिंगमधून आपल्या करियरची सुरूवात करणारी अभिनेत्री प्रणाली भालेराव मुंबईतील मुलूंड येथे राहणारी आहे.
प्रणालीला बालपणापासून अभिनयाची आवड होती. 
तिची आवड जोपासण्यासाठी तिची आई शालिनी भालेराव व वडील संजय भालेराव यांची साथ मिळाली. 
सामान्य कुटुंबातील प्रणालीने आपले शिक्षण पूर्ण केले आणि ती अभिनय क्षेत्राकडे वळली.
कित्येक वर्ष मॉडेलिंग केल्यानंतर तिने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.
मिलिंद कवडे दिग्दर्शित टकाटक चित्रपटात तिला काम करण्याची संधी मिळाली.
या चित्रपटात तिने पत्नीची भूमिका साकारली होती. पण या चित्रपटातील तिच्या भूमिकेनं प्रेक्षकांच्या मनात घर केलं.
इतकंच नाही तर तिने पहिल्याच सिनेमात बोल्ड सीन दिले.
टकाटक या चित्रपटात प्रेक्षकांना अभिजीत आमकर आणि प्रणाली भालेराव यांच्यावर शूट करण्यात आलेलं “ये चंद्राला…’’ एक रोमँटिक साँग पाहायला मिळाले होते.
यातील चंद्राची शीतलता आणि अभिजीती-प्रणालीचा हॉट अंदाज प्रेक्षकांना घायाळ करणारा ठरला होता. या गाण्याला युट्युबला केवळ काहीच महिन्यातच १ करोड २१ लाखापेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.