रोहितने गर्लफ्रेंड गायिका जुईली जोगळेकरला सोशल मीडियावर दोघांचे फोटो शेअर करून अनोख्या पध्दतीनं वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हे कपल सध्या सा-यांच्या चर्चेचा विषय ठरलं आहे. गेल्या काही वर्षांपासून जुईली आणि रोहीत रिलेशनशीपमध्ये आहेत. रोहित आणि जुईली नेहमीच एकमेकांसोबत खूप फोटो शेअर करत असतात. दोघेही सोशल मीडियावर प्रत्येक अपडेट शेअर करत असतात. व्हॅलेन्टाईन डेच्या दिवशी एकमेकांसह फोटो शेअर करुन त्यांनी आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. नेहमीप्रमाणे दोघांची केमिस्ट्री खूप छान वाटते आहे. दोघांमध्ये प्रेमांकुर फुलले असून दोघांचं नातं दिवसेंदिवस बहरत चाललं आहे. त्यांचे फोटो पाहून एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले असल्याचे पाहायला मिळते जुईलीसुद्धा गायिका असून ‘सूर नवा ध्यास नवा’ या कार्यक्रमातून तिच्या सुमधुर गायकीनं तिनं प्रेक्षकांची मन जिंकली आहेत.