सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे वैदही परशुरामीने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली.
सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे वैदही परशुरामीने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली.
डॉ. काशीनाथ घाणेकर’ चित्रपटात कांचन घाणेकर यांची भूमिका साकारून वैदेहीने प्रेक्षकांना भुरळ पाडली.
तिने मराठीसह हिंदी सिनेमातही काम केले आहे. वैदेहीने ‘वेड लागी जीवा’ या सिनेमातून मराठी सिनेसृष्ट्रीत पदार्पण केले होते.
वैदही सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते. वैदेही कधी व्हिडीओ तर कधी फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा वैदहीच्याअभिनयावर रसिक फिदा आहेत.
बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत ती ‘वजीर’ सिनेमातही झळकली होती.
. या सिनेमात छोटी भूमिका असली तरी अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रीन शेअर केलेल्या वैदेहीच्या भूमिकेचे कौतुक झाले होते
सिम्बा सिनेमात तिने रणवीर सिंगच्या बहिणीची भूमिका साकारली होती जी प्रेक्षकांना भावली होती.
मुंबईत जन्म झालेल्या वैदेहीने विधी शाखेची पदवी घेतली आहे. यासह तिने काही जाहिरातींमध्येही काम केले आहे. तिने कथ्थकचेही प्रशिक्षण घेतले आहे.