अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर आज लग्नबंधनात अडकले. पुण्यात सिद्धार्थ व मितालीचा लग्नसोहळा थाटामाटात पार पडला.
अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर आज लग्नबंधनात अडकले. पुण्यात सिद्धार्थ व मितालीचा लग्नसोहळा थाटामाटात पार पडला.
या विवाह सोहळ्याच्या फोटोंची सर्वांनाच उत्सुकता होती. तर आता या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
गेल्या कित्येक दिवसांपासून या दोघांच्या लग्नाची चर्चा होती.
अस्सल मराठमोळ्या पद्धतीने हा सोहळा संपन्न झाला. मितालीने हिरव्या रंगाची नऊवारी साडी नेसली होती.
सिद्धार्थने रॉयल ब्लू कलरचा कुर्ता आणि धोतर परिधान केलं होतं.
मिताली आणि सिद्धार्थ या जोडीने लग्नगाठ बांधल्यानंतर त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखे व्हायरल झाले आहेत.
दोन वर्षांपूर्वी व्हॅलेंटाइन डेला पहिल्यांदा सिद्धार्थने इन्स्टाग्राम पोस्टमधून आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. त्यानंतर त्याच वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात सिद्धार्थने मितालीला प्रपोज केले होते.
लग्न ठरल्यापासून त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक अपडेट सिद्धार्थ व मिताली चाहत्यांसह शेअर करत आहेत. त्यांच्या हळदीचे, मेहंदीचे, संगीत सेरेमनीचे अनेक फोटो याआधीच व्हायरल झाले आहेत.
तूर्तास या नवविवाहित दांम्पत्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. त्यांच्या फोटोंंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव सुरु आहे.
या लग्नसोहळ्याला मराठी कलाविश्वातील अनेक मराठी सेलिब्रिटींनी हजेरी लावली. अभिनेता उमेश कामत, अभिज्ञा भावे, पूजा सावंत, भूषण प्रधान असे अनेक सेलिब्रिटी यावेळी हजर होते.
साधारण चार वर्षांपूर्वी कोल्हापुरात एका कार्यक्रमात सिद्धार्थ व मितालीची पहिली भेट झाली होती.