'बिग बॉस मराठी' सीझन 1 मधून स्मिता गोंदकर हे नाव घराघरात पोहोचले.

‘बिग बॉस मराठी’ सीझन 1 मधून स्मिता गोंदकर हे नाव घराघरात पोहोचले.

‘पप्पी दे पारुला’ म्हणत तिने रसिकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं.

स्मिता गोंदकर विविध सिनेमांमधून वेगवेगळ्या भूमिका साकारत रसिकांच्या मनात घर केलं आहे.

सिनेमासोबतच आपल्या हॉट आणि बोल्ड लूकमुळेही ती कायम चर्चेत असते. तिच्या ऑनस्क्रीन लूकप्रमाणे ऑफस्क्रीन लूकलाही चांगलीच पसंती मिळत असते.

मात्र आता स्मिताने सावळ्या रंगाचे फोटो शेअर केले आहेत.

तिने ब्राउन रंगाच्या स्कीनटोनमध्ये फोटो शूट केले आहे. तिचे हे फोटोशूट चर्चेत आले आहे.

स्मिताने फोटो शेअर करत म्हटले ब्राउन इज ब्युटिफुल

त्वचेचा रंग कधीच तुमचे चारित्र्य ठरवू शकत नाही, असेही तिने म्हटले आहे. 

सौंदर्याला कोणताच रंग नसतो, असे तिने फोटोशूटसोबत म्हटले आहे.

स्मिताचे हे फोटो पाहून सगळेच थक्क झाले आहेत.

खरेतर या फोटोत स्मिताला ओळखताही येत नाही.

सोशल मीडियावरही ती बरीच अ‍ॅक्टिव्ह असून तिचे अनेक फॉलोअर्स आहेत.

स्मिताला नेहमी वेगवेगळ्या भूमिका व गोष्टी करायला आवडतात.

स्मिता सांगते की, कलाकारांनी स्वतःमध्ये बदल करत नवनवीन गोष्टी करायला पाहिजेत.

स्मिताचे हॉलिवूडमध्ये काम करायचे स्वप्न आहे. हे माझे खूप आधीपासूनचे स्वप्न आहे आणि लवकरच मी खूप मेहनत करून आणि प्रामाणिकपणे काम करून हे स्वप्न सत्यात पूर्ण करणार असल्याचे ती सांगते.